आरोग्य समितीची रचना

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम(शासकिय योजना)

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम :- दोन अपत्यापर्यतचे म्हणजे छोटे कुटुंब हा संकल्प करण्यात आला हयाकरिता खालील बाबींचा स्विकार करुन कुटुंब नियंत्रित केले जाते.
        अ) स्त्री + पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करुन घेणे.
        ब) दोन अपत्यामध्ये जन्माचे अंतर राखण्याकरिता तांबीचा वापर करणे.
        क) गर्भनिरोधक गोळया, निरोध इ.साधनांचा वापर करणे.
        ड) कुटुंब कल्याण कार्यक्रमातंर्गत सन २०१३-१४ या वर्षात ६१०० उदिष्टा पैकी ६१०१ शस्ऋाक्रिया करण्यात आल्या ही टक्केवारी १०० टक्के आहे. हयामध्ये २२ टक्के बिनटाका पुरफष नसबंदी शस्ऋाक्रिया समाविष्ट आहे.

सुधारित सावित्रीबाई फुले कल्याण योजनाः-
हया योजनेअंतर्गत सन २०१३-१४ वर्षाकरिता शासनाकडून २१.४० लक्ष अनुदान मंजूर असून आतापर्यंत १९९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे.या योजनेनुसार दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांकरिता एकही मुलगा नसताना नसबंदी शस्ऋाक्रिया करणा-या लाभार्थ्यांना एक मुलगी असल्यास रु. २००० रोख व मुलीच्या नावाने रु. ८००० राष्ट्रीय बचत प्रमाणपऋ आणि दोन मुली असल्यास रु. २००० रोख व मुलीच्या नावाने रु. ४००० प्रत्येकी अशाप्रकारे रु. ८००० राष्ट्रीय बचत प्रमाणपऋ स्वरुपात देण्यात येतो.

डॉ. आंनदीबाई जोशी गौरव पुरस्कार :-ही योजना राज्यातील उत्कृष्ठ कार्या करणाऱ्या आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयासाठी व जिल्हा रुग्णालय, खाजगी संस्थात्याचप्रमाणे डॉक्टरांना वैयक्तिक स्वरुपाचे पुरस्कार देवून प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या ८ वर्षापासून डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. राज्यातील माता व बालमत्रत्यूचे प्रमाण कमी करणे,प्रजनन व बाल आरोग्याविषयी सेवा अधिक प्रभावीपणे देणे,कुटूंब कल्याण उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे हा या पुरस्कार योजनेच्या मागिल महत्वाचा उद्देश आहे.

या योजनेत ३ प्राथमिक आरोग्य केंद्र यांना अनुक्रमे रु.२५ हजार, रु.१५ हजार, रु.१० हजार आणि ३ उपकेंदे यांना अनुक्रमे रु.१५ हजार, रु.१० हजार, रु.५ हजार प्रमाणे जिल्हा स्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहे. १ ग्रामीण रुग्णालय+ उपजिल्हारुग्णालय यांना रु. ५० हजार प्रमाणे जिल्हा स्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहे.या साठी प्रत्येक तालुक्यातील किमान १ सर्र्वोत्कत्रष्ठ संस्था, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे नामनिर्देशन प्राप्त होणे गरजेचे आहे.तेंव्हा या वर्षीच्या योजनेत प्रत्येक तालुक्यातील एका सर्वोत्कत्रष्ठ संस्थेची निवड होण्याच्या दृष्टीने त्या संस्थेने सन २०१२-२०१३ या वर्षात कुटूंब कल्याण व प्रजनन बाल आरोग्या कार्यक्रमात केलेले कार्य, स्वच्छता,टॉपटीपपणा, गुणवत्ता,लोकांच्या प्रतिकिया यांची पाहणी करुन या योजनेतील दिलेल्या निकषावर आधारित मुल्यमापन करावे.व निवड करुन या योजनेतील दिलेल्या निकषांवर आधारित मुल्यमापन करण्यात येते व निवड समितीव्दारे उत्कत्रष्ठ ठरणऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र , ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, सुत्रांसाठी व जिल्हा रुग्णालय, खाजगी संस्था त्याचप्रमाणे डॉक्टरांना पुरस्कार देण्यात येतो.

मातृत्व अनुदान योजना
राज्य शासनाच्या ग्रामीण भागात सुरु करण्यात आलेली मातृत्व अनुदान योजना ही सन 2004-2005 पासून चंद्रपूर जिल्हयात कार्यान्वीत करण्यात आलेली आहे.सदर योजनेचा लाभ नवसंजीवन योजनेंतर्गत आदिवासी गरोदर मातांना अनुज्ञेय आहे.

योजनेचा उद्देश :- जिल्हयातील आदिवासी मातांचे आरोग्य सुदृढ राहणे, महिलांचे आरोग्य संस्थामध्ये होणा-या प्रसूतीचे प्रमाण वाढविणे,जिल्हयातील माता मृत्यू व अर्भक मृत्यू कमी करणे.

लाभार्थी निकष :-

 • सदर गर्भवती महिला ही आदिवासी असावी व ती ग्रामीण भागातील असावी. आदिवासीचे प्रमाणपत्र किंवा शिधापञिका सादर करावे लागेल. सदर कागदपत्र उपलब्ध नसल्यास सबंधीत ग्रामपंचायतीने दिलेले प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
 • सदर महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करतांना कमीत कमी 19 वर्षे असावे.
 • सदर योजनेचा लाभ हा तिन जिवंत अपत्य पर्यंत देय राहील. (2 जीवंत व सध्या गरोदर )
लाभाचे स्वरुपः- पात्र आदिवासी गरोदर मातेस एकुण रुपये 400/- धनादेशाचे स्वरुपात व रुपये 400/-औषधी स्वरुपात आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
अर्ज करण्याची पध्दतः- पात्र गर्भवती लाभार्थीने जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन आरोग्य सेविकेकडे प्रसूतीपूर्व नोंदणी करुन घ्यावी. अर्जासोबत लागणारे कागदपत्रे -
 • अनुसुचित जमाती मध्ये असल्याबाबतचा जातीचा दाखला.
 • ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

हया कार्यक्रमाअंतर्गत वर्ष २०१३-१४ अखेर झालेले कार्यः- गरोदर माता नोंदणी ९५ टक्के,
बीसीजी १०२ टक्के,
डीपीटी ;३री माऋााद्ध ९९ टक्के,
गोवर ९७ टक्के,
पोलिओ ;३री माऋााद्ध ९९ टक्के व
गरोदर माता धनुर्वात प्रतिबंधक लस ९० टक्के पर्यंत साध्य झालेले आहे.

सुरक्षित मातृत्व व बाळाचे लसीकरण

सुरक्षित मातृत्व व बाळाचे लसीकरण -
मातृत्व ही प्रत्येक स्ञीच्या आयुष्यातील अलौकीक व महत्वपुर्ण घटना आहे.माता झाल्याशिवाय स्ञीच्या आयुष्याला पुर्णता येत नाही. मातृत्व प्रक्रियेत तिन महत्वाचे टप्पे आहेत.

 • प्रसूतीपूर्व
 • सुरक्षित प्रसूती
 • प्रसूती पश्चात.प्रसूती ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी हया तिनही टप्प्यावर योग्य वेळी काळजी सेवा व मार्गदर्शन मिळाल्याने प्रसूती सुरक्षित होवून बाळ व बाळंतीण सुखरुप राहू शकतील व मातेला सुरक्षित मातृत्च आपण देऊ शकतो.
आरोग्य विभागातर्फे मातेकरिता
 • प्रसूतीपूर्व काळजी व सेवा
 • सुरक्षित प्रसूती
 • प्रसूतीपश्चात सेवा दिल्या जातात. माता गरोदर असतांनाच बालकाची योग्य काळजी व लसीकरण करुन त्यांना संरक्षण देणे हिताचे आहे. गर्भवती मातेची नोंदणी होताच तीला धनुर्वात प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात येतो व एक महिन्यानंतर दुसरा डोस देण्यात येतो.
आजची मुले ही उद्याची संपत्ती आहे. बालकांना निरोगी ठेवणे आपणांस सहज शक्य आहे. आपल्या देशात होणार्याद एकुण बालमृत्यूपैकी अंदाजे 50टक्के बालमृत्यू बालकाच्या पहिल्या वाढदिवसांपूर्वीच होतात. बालमृत्यू व अपंगत्वाचे प्रमाण रोखण्याकरिता बाळाला योग्य त्या वयात योग्य प्रतिबंधक लसी देऊन प्राणघातक रोगांपासून संरक्षण देता येते. बाळाचे सहा जीवघेण्या आजारापासून संरक्षण करण्याकरिता त्यांना रोगप्रतिबंधक लसी देण्यात येतात.बाळाला क्षयरोग, धनुर्वात, डांग्या खोकला, घटसर्प, पोलीओ, गोवर, कावीळ व जीवनसत्व अ इत्यादी रोगप्रतिबंधक लसी बाळ 1 वर्षाचे होण्यापूर्वीच देण्यात येतात. हया सर्व रोगप्रतिबंधक लसी सर्व शासकीय आरोग्य संस्थामध्ये मोफत देण्यात येतात.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनाः-

 1. जननी सुरक्षा योजना :-
  राज्यातील दारिद्रय रेषेखालील महिलांचे आरोग्य संस्थामध्ये होण-या प्रसुतीचे प्रमाण वाढविणे तसेच राज्यातील मात मृत्यू व अर्भक मृत्यू चे प्रमाण कमी करणे या योजनेचे प्रमुख धोरण आहे.सदर योजनेचा लाभ हा सर्व अ.जा.व अ. ज.या मातांना तसेच ईतर जाती मधील सर्व बी.पी.एल. मातांना होणार आहे.सदर योजनेमुळे भंडारा जिल्हयातील संस्थेचे प्रसूतीचे प्रमाण वाढलेले आहे. हया योजनेअंतर्गत सन २०१३-१४ मध्ये ग्रामीण भागातील रु. ७००+- प्रमाणे एकूण ८,५७९ लाभार्थ्यांना तसेच शहरी भागातील रु ६००+- प्रमाणे एकूण ५८१ लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे.ग्रामीण भागातील घरी प्रसुती झालेल्यांना रु.५००+- प्रमाणे एकूण २७ लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे. तसेच रु.६००+- प्रमाणे एकूण ५,९७८ आशा सवयंसेविकांना जेएसवाय लाभार्थीचा लाभ दिलेला आहे.एकूण ९,४६३ उदिष्टा पैकी माहे सन २०१३-१४ अखेर ९,१८७ साध्य झालेली असून एकूण टक्केवारी ९७ टक्के आहे.
 2. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
  भंडारा जिल्हयात जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ;जेएसएसके ७ आक्टोंबर २०११ पासुन सुरू झाला. यांतर्गत गरोदर मातेला व १ वर्षापर्यंतच्या बालकांना खालीलप्रमाणे मोफत सेवा दिल्या जातात.
  • मोफत प्रसूती तसेच मोफत सिजरीन शस्त्रक्रिया.
  • प्रसूती संदर्भातील औषधे व लागणारे साहित्य मोफत पुरविणे.
  • प्रयोगशाळेतील आवश्यक त्या तपासण्या मोफत देणे.
  • प्रसूती पश्चात मातेला मोफत आहार देणे
  • मोफत रक्तसंक्रमण् देण्यासाठी मोफत रक्त पुरवठा.
  • प्रसूतीसाठी घ्।रापासून दवाख।ान्यात मोपफत वाहन व्यवस्थ्।ा.
  • एका आरोग्य संस्थेतून पुढील संदर्भ सेवा देण्यासाठी दुस-या आरोग्य संस्थेत पोहोचविण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था.
  • प्रसूती पश्चात आरोग्य संस्थ्।ेतून घ्।री पोहोचविण्यासाठी मोफत वाहन व्यवस्थापन शासकीय आरोग्य संस्थेमध्ये गरोदर मातेस कोणतीही फी आकारण्यात येत नाही.
  हया कार्यक्रमांअंतर्गत गरोदर माता व नवजात बालकांसाठी निःशुल्क सेवा देण्यात येते .हया योजनेत मोपफत प्रयोगशाळा, रक्त तपासणी व गरोदर मातेला ने-आण करण्यासाठी मोपफत वाहन व्यवस्था असून संपर्कासाठी टोल पफ्री नं.१०२ आहे.सन २०१३-१४ अखेर १४,४१७ प्रसूती झालेल्या गरोदर मातांना व प्रसूती मातेला घरापर्यंत एकूण १४,००२ ;९७ टक्केद्ध लाभार्थ्यांना घरपोच सेवा दिल्या. १ वर्षापर्यंतच्या ८७३ नवजात शिशुस भरती करण्यात आले.त्यापैकी१५६ बालकाला घरापर्यंत ;१८ टक्के; ड!ाप बॅकद्ध सेवा देण्यात आली
 3. सिकलसेल नियंऋाण कार्यक्रमः-
  हया कार्यक्रमाअंतर्गत सन २०१३-१४ मध्ये १,५०,००० उदिष्टां पैकी १,५६,५८६ लोकांची तपासणी सन २०१३-१४ अखेर करण्यात आली.एकूण टक्केवारी १०४ टक्के आहे.यापैकी एकूण १२६ सिकलसेल ग्रस्त लोकांना लाल कार्ड,१८७८ सिकलसेल वाहकांना पिवळा कार्ड वाटप करण्यात आलेला आहे.सिकलसेल हा आजार जगात सर्वत्र आढळणारा आजार आहे. मागासवर्गिय व दुर्बल घटकात आढळणारा हा आजार अनुवांशिक असुन रक्तातील दोषामुळे होतो. हा आजार आई-वडीलांपासुन मुलांकडे प्रसारीत होत असतो. सिकलसेल या आजारावर संपुर्ण नियंत्रण नाही पण नियमित तपासणी व योग्य औषधोपचार याने आजारावर नियंत्रण ठेवता येते. या सर्व गोष्टी लक्षात घेता सिकलसेल या आजाराविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. सिकलसेल या आजाराविषयी सर्वसामान्यांना माहिती देणे आवश्यक आहे. ही काळाची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्रा शासनातपर्फे ही सिकलसेल या विषयावर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे.समाजात या रोगाविषयी गैरसमज व अंधश्रध्दा आहे म्हणून जनजागत्रती करणे आवश्यक आहे. घरोघरी जाउफन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिच्या रक्ताची चाचणी करुन असे रक्त दोष असलेले व्यक्ति शोधुन त्यांना योग्य समुपदेशन करुन या अनुवांशिक आजाराचा प्रसार थांबवणे आवश्यक आहे. त्यासोबतच त्यांना विवाह पुर्व समुपदेशन करुन योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. जनसामान्यांनपर्यंत सिकलसेल विषयी सर्व माहिती पोहचविणे व त्यांना योग्य मार्गदर्शन करुन या आजारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे त्यासाठी जिल्हयामध्ये सन २००९ पासुन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत सर्व शासकिय आरोग्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे.तसेच या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय औषधी अनुसंधान संस्था कार्यरत असुन ही संस्था जनजागृतीचे कार्य करीत आहे.
 4. मानव विकास कार्यक्रमः-
  हया कार्य्रक्रमाचा मुखय उद्देश मृत्यूचा दर कमी करणे, माता मृत्युदर कमी करणे,जोखमीच्या माता शोधून काढणे हा आहे. हया कार्यक्रमाअंतर्गत सन २०१३-२०१४ मध्ये एकूण ६३५ शिबीरे जिलहयात आयोजित करण्यात आली.त्यामध्ये१८,६२४ प्रसुतीपूर्व मातांची;एएनसीद्ध तपासणी करण्यात आली आणि ११,२३० स्तनदा मातांची तपासणी करण्यात आली.तसेच ;० ते ६ महिने वयोगटद्ध मधील एकूण १२,८३८ मुलांची तपासणी करण्यात आली.
 5. आशा स्वयंसेविका योजनाः-
  राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत' आशा स्वयंसेविका' योजना आदिवासी बहुल १५ जिल्हयामध्ये राबविण्यात येत आहे. आरोगय संवर्धन ,विविध प्रतिबंधक व उपचारात्मक उपाययोजना तसेच समाजामध्ये जाणीव व जागृती वृद्धिगत करणे, यामध्ये 'आशा' स्वयंसेविकेची महत्वाची भूमिका आहे.१५०० पर्यंत लोकसंखया असल्यास १ आशा स्वयंसेविका अशाप्रकारे लोकसंखया निकष आहेत.संस्थेतील प्रसूती वाढविणे,ईतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यासाठी मदत,मोफत संदर्भ सेवेचा प्रचार,कुटूंब कल्याण प्रचार,माता व बाल आरोग्याविषयी प्रबोधन ,ग्राम आरोग्य पोषाहार दिनामध्ये मदत,किरकोळ आजारावर उपचार ई. बाबत आशा स्वयंसेविका महत्वाची भूमिका बजावत असते.त्यांच्या कामाच्या अनुषंगाने मोबदला शासनाकडून मिळत असतो. आशा स्वयंसेविकेस दरमहा आरोग्य विषयक मासिके व गणवेश जिल्हा स्तरावरफन दिले जातात व उत्कष्ठ काम करणा-या आशा कार्यकर्तीस रोख पुरस्कार देउफन जिल्हा स्तरावर सत्कार करण्यात येतो.
 6. रूग्ण कल्याण समितीची स्थापनाः-
  ही समिती प्रा. आ.केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कार्यरत आहे.यातून शासकीय दवाखाने व आरोग्य केंद्रामापर्फत जनतेला उत्तरदायी अशा आरोग्य सेवा देण्याचा उद्देश आहे.
  उदि/दष्टेः-
           ° दवाखान्यातील व कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवांचा विकास करणे.
           ° राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवणे
           ° प्रा. आ.केंद्राच्या + ग्रामीण रुग्णालय+जिल्हा रुग्णालय अखत्यारित असलेल्या कार्यक्षेत्रात आरोग्य सेवा+ आरोगय शिबीरांचे नियोजन करणे
           ° शासकीय सेवा किमान गरजा पाहून दिल्या जात आहेत. याची खात्री करणे व लाभार्थींच्या याबाबतच्या प्रतीक्रिया जाणून घेणे.
           ° देणगीस्वरुपात किवा इतर प्रकारे आर्थिक भर घालणे.
  या समीतीमध्ये वर्षातून दोनदा नियामक मंडळाच्या सभा घेणे बंधनकारक आहे.व कार्यकारी मंडळाच्या सभा दोन महिण्यातून एकदा घेणे समीतीला बंधनकारक आहे.
  नियामक मंडळामध्ये हे प्रा.आ.केंद्र कार्यक्षेत्रातील जि.प. सदस्य हे पदसिदध अध्यक्ष व प्रा.आ.केंद्र कार्यक्षेत्रातील वैदकिय अधिकारी हे सदस्य सचिव असतात आणि इतर सदस्य कार्यरथ असतात. कार्यकारी मंडळामध्ये हे तालुका आरोग्य अधिकारी हे पदसिदध अध्यक्ष व प्रा.आ.केंद्र कार्यक्षेत्रातील वैदकिय अधिकारी हे सदस्य सचिव असतात आणि इतर सदस्य कार्यरथ असतात. रुग्णकल्यान समितीच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार उदा. प्रसूती झालेल्या गरजू महिलेस साडी देणे, बाळासाठी उबदार कपडे देणे ;ओगडे टोपरे. गरजू व गरीब रुग्णांसाठी निःशुल्क सेवा मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशिल राहणे.साधन सामुग्री व गाडी यांची देखभाल करणे.गरजु रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधी उपलब्ध करफन देणे.व रफग्णासाठी पाणीपुरवठा दुरफस्ती व देखभाल करणे.इत्यादी खर्चाची पुर्तता रुग्णकल्यान समितीच्या निधीतुन करता येवू शकते.
 7. आयर्न पफॉलिक अॅसिड सप्लीमेंन्टेशन
  ही योजना माहे जून २०१३ पासून अंमलात आली. हया योजनेमध्ये ईयत्ता ६ वी ते १२ वी मधील मुला-मुलींना व शाळेत न जाणा-या १० ते १९ वषै वयोगटातील मुलींना लोहयुक्त गोळया कवतरित करण्यात येत आहे. लोहाच्या कमतरतेमुळे रक्त क्षयाचे प्रमाण ५५ टक्केपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ही योजना महाराष्ट/ शासनाने सुरफ केलेली असून सन २०१३-१४ अखेर मुले-मुली व नोडल शिक्षक इ.धरफन १,३३,३१३ हयांनी लाभ घेत

राष्ट्रीय संसर्गजन्या /किटकजन्य तसेच दुर्धर रोग नियंऋाण कार्यक्रम

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम :-
हया अंतर्गत हिवताप,चंडीपुरा विषाणु मेंदुज्वर, चिकणगुनिया, डेंगुताप, हत्तारोग इ. चा समावेश होतो. किटकजन्य रोग नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
       ° कोणताहि ताप आल्यास आरोग्य कर्मचाऱ्या मार्फत रक्त तपासणी करुन योग्य उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
       ° लोकांना आपल्या घरात ,परिसरात व गुरांच्या गोठयात स्वच्छता ठेवण्याबाबत आरोग्य शिक्षण दयावे.
       ° सॅण्ड प्लाय पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करण्यात यावा आणि झोपताना शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकला जाईल           असे कपडे वापरावे.
       ° डास व डुकरापासून बचाव करावा.
       ° डासांचे अळया आढळलेले घरगुती पाणी साठे नष्ट करा व डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडावे.
       ° संडासाच्या व्हेंट पाईपला जाडी किंवा जाडीदार कापड बांधावे.
       ° साचलेल्या पाण्यात अथवा गटारात मातीचे तेल टाकावे.
       ° आठवडयातून एक दिवस मंगळवार हा कोरडा दिवस पाळावा.
       ° घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवावा.
       ° जनतेने आपल्या गावात येणाऱ्या आरोग्य कर्मचार्यांना सहकार्य द्यावे.
       ° ताप उद्रेक ग्रस्त गावातंर्गत संबंधीत ग्रामपंचायत निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करुन धुर फवारणी करुन घ्यावी.

मार्च २०१४ अखेर १५१११० उदिष्टा पैकी ३५६१२५ एकुण रक्त नमुने घेण्यात आले व त्यामध्ये दुषीत आढळलेल्या १६८ लोकांवर संपूर्ण उपचार करण्यात आला. मार्च २०१४ अखेर पीएपफ चे ३७ रुग्ण आढळले. .

राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम :-
कुष्ठरोग आजार मायकोबॅक्टेरियम लेप्री जंतुमुळे होणारा दिर्घमुदतीचा आजार आहे. या आजाराची प्रमुख लक्षणे त्वचेवर फिक्कट पांढरा किंवा लालसर रंगाचा न खाजविणारा न दुखणारा बधिर असलेला चट्टा व मज्जातंतु जाड होणे ही आहेत. या रोगांवर प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. या रोगाचे दोन प्रकार आहेत
       १. असंसर्गजन्य रोग प्रकार - हयामध्ये रुग्णाला ६ महिने कालावधीचा एम.डी.टी.
       २. संसर्गजन्य रोग प्रकार - हयामध्ये रफग्णाला १२ महिने कालावधीचा एम.डी.टी.उपचार घ्यावा लागतो.
मार्च २०१४ अखेर एकुण ५०० नविन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले. सध्या नियमित उपचाराखाली ७५ असंसर्गजन्य आणि २२६ संसर्गजन्य कुष्ठरुग्ण आहेत. मार्च २०१४ अखेर कुष्ठरोगाचे दर १० हजारी प्रमाण २.४० आहे. एकुण ९ कुष्ठरुग्णाची सन २०१३-१४ या वषात पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करण्यात आली. सन २०१३-१४ मध्ये ५८५ कुष्ठरुग्ण रोगमुक्त करण्यात एम.डी.टी. उपचार घ्यावा लागतो.

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम :-
क्षयरोग हा आजार मायकोबॅक्टेरियम टयुबरक्युली जंतुमुळे होणारा दिर्घमुदतीचा आजार आहे. या आजाराची प्रमुख लक्षणे दोन आठवडयापेक्षा अधिक काळ ताप व खोकला येणे व थुंकी पडणे इ.आहेत. भंडारा जिल्हयात मे २००२ पासून 'डॉटस/ उपचार पध्दती सुरफ करण्यात आली. मार्च २०१४ अखेर एकुण २२८ संशयीत थुंकी नमुने नोंदविण्यात आले. त्यापैकी ५७ थुंकी नमुने positive आढळले त्यामध्ये २८ रुग्णांना क्षयरोगाचे निदान करण्यात आले व २८ रुग्णांना डॉटस प्रणाली औषधी सुरफ करण्यात आली.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

ही योजना दि.२१ नोव्हेंबर२०१३ पासून शासनाने केलेली आहे.सदर योजनेत लाभार्थ्यांच्या मदतीकरिता आरोग्य मित्रांची नेमणूक करण्यात आलेली आहे.या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील पिवळया शिधाधारक कुटूंबाबरोबरच अंत्योदय अन्न योजना,अन्नपुर्णा शिधा पत्रिका धारक कुटूंबे आणि दारिद्रय रेषेवरिल केशरी रंगाच्या शिधा पऋिाका धारक कुटूंबे ज्यांचे वार्षिक उत्पन्न रफ.१ लक्ष किंवा त्यापेक्षा कमी आहे अशी आरोग्य ओळखपत्र असणारी कुटुंबे या योजनेचा लाभ मिळण्यात पत्रा आहेत.या योजनेमध्ये ९७२ मेडिकल प्रोसिजर्सचा समावेश असून लाभार्थी कुटूंबास प्रति कुटूंब प्रति वर्ष रु.१.५० लक्षचा मर्यादेत उपचार अनुज्ञेय राहतील आणि दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील लाभार्थी कुटूंबाचा विमा हप्ता शासनाकडून विमा कंपनीस अदा केला जाईल.हया योजनेमध्ये आपल्या जिल्हयात हेल्थ काड्र माहे माच्र २०१४ अखेर पर्यंत कार्ड प्रिंट झालेले आहे

नागरिकांची सनद

अ.क्रं. सेवेचा तपशील सेवापुरविणारे अधिकारी+कर्मचारी यांचे नाव व हुद्दा सेवा पुरविण्याची विहीत मुदत सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करणा-या अधिका-याचे नाव व हुद्दा
राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान अर्तगत सर्व कामे कार्यसन क्रमांक डॉ. अश्विन एन.राघमवार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक७ दिवस डॉ.व्हि.व्हि.डोईपफोडे जिल्हा आरोग्य अधिकारी
विभागिय चौकशी ,माहितीचा अधिकार आस्थापना नस्तीवर कार्यवाही करणे .कार्यसन क्रमांक १ श्री.के.आर.खोब्रागडे कक्षअधिकारी तथा प्रशासन अधिकारी ---,,------,,---
आस्थापनेशी निगडीत नस्तीवर कार्यवाही करणे.वार्षीक प्रशासन अहवाल.कार्यसन क्रमांक २ श्री.एस.डब्लु खराबे अधिक्षक---,,--- ---,,---
न्यायालयीन प्रकरणे सांभाळणेकार्यसन क्रमांक ३ श्री.एम.डी.केवट, अधिक्षक---,,------,,---
लेखा विषयक संपर्ण कामे,लेखा आक्षेप कार्यसन क्रमांक १४ श्री.ए.के.नौकरिया, स.ले.अ---,,------,,---
लेखा आक्षेप, प्रा.आ.केंद्रांना तरतुद वाटप कार्यसन क्रमांक श्री.एल.यु. शेंख, व.स. ;लेखाद्ध---,,------,,---
आरोग्य सेवक,आ.सहा. ,कुष्ठरोग तंऋाज्ञ,आरोग्य पर्यवेक्षक या संर्वगाचे संपुर्ण आस्थापना विषयक कामेकार्यसन क्रमांक ५ श्री.एस.एन.लुटे व.स.---,,------,,---
वैद्यकिय अधिकारी ;गट अ व गट बद्ध यांचे वेतन देयके काढणेकार्यसन क्रमांक ११ श्री.पी.बी.चव्हान व.स.---,,--- ---,,---
सेवानिवत्रत्त कर्मचा-याचे सेवानिवत्रत्ती विषयक संपुर्ण कामे करणे कार्यसन क्रमांक श्रीमती.एन.डब्लु.वाडीभस्मे क.स.---,,--- ---,,---
१०क्निष्ठ लिपीक,वाहन चालक परिचर यांची आस्थापना विषयक कामे.कार्यसन क्रमांक कु.के.जी.मलकाम क.स.---,,--- ---,,---
११कर्यालयीन आस्थापना विषयक वेतन देयके तयार करणे,आकस्मिक देयक तयार करणे.कार्यसन क्रमांक श्रीमती.के.एस.गजभिये क.स. ---,,------,,---
१२आवक+जावक शाखेचे संपुर्ण कामे कार्यसन क्रमांक१३ श्रीमती.यु.आर.रामटेके क.स१ दिवस ---,,---
१३आरोग्य सेविका,आरोग्य सहारूयीका यांचे आस्थापने विषयक संपुर्ण कामे.कार्यसन क्रमांक ४ श्री.डी.आर.बागडे क.स.७ दिवस ---,,---
१४कार्यसन क्रमांक सौ.आर.आर.पेठकर क.ले.अ.---,,------,,---
१५कार्यसन क्रमांक श्री.एम.एम.गाडगे स्टेनो---,,------,,---
१६कर्यालयीन कर्मचा-याचे संपुर्ण आस्थापना विषयक कामे.कार्यसन क्रमांक ८ श्री.एन.एस.सार्वे क.स---,,------,,---
१७वै.अ. गट-अ, गट-ब यांची आस्थापना कार्यसन क्रमांक श्री. एम.आर.काटेखाये, क.स.---,,------,,---
१८रोखपालाचे संपुर्ण कामेकार्यसन क्रमांक श्री.एस.जी. कृहाडे,क.स. ---,,------,,---
१९प्रसिध्दी माध्यम कार्यसन क्रमांक श्री.एन.पी.नागपुरकर प्र.जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी---,,--- ---,,---
२०साथरोग कक्षाचे संपुर्ण कामे कार्यसन क्रमांक डॉ. श्रीकांत आंबेकर साथरोग कक्ष७ दिवस---,,---
२१दुर्धर आजार,स्थायी समिती कामे. कार्यसन क्रमांक १९ श्री.एस.टी.श्रीनाथ अवैद्यकिय पर्यवेक्षक---,,--- --,,--
२२उपकेंद्र नव्याने निर्माण करणे,खाजगी नर्सीग होमला नोंदनी बाबत मान्यता कार्यसन क्रमांक २० श्री. आर.एन. डोर्लीकर, आरोग्य पर्यंवेक्षक---,,------,,---
२३कुटुंब कल्याण क्रार्यक्रम व साविऋाी बाई पफुले कन्या योजना कार्यसन क्रमांक श्री.एम.जी.मेश्राम विस्तार अधिकारी ;सांखियकीद्ध---,,--- ---,,---
२४ए.एपफ.पी.सर्व्हेक्षण व प.पो.ल.मोहिमकार्यसन क्रमांक श्री.डी.बी. चापफले, सांखियकी पर्यवेक्षक ---,,------,,---
२५जन्म-मत्रत्यू नोंदणीे कार्यसन क्रमांक २२ श्री.आर.बी. पतंगे, सां.अन्वेशक.---,,------,,---
२६जिल्हा औषधी भांडार कार्यसन क्रमांक श्री पी.एल.कंळबे जिल्हा औषधिनिर्माधिकारी---,,------,,---
२७लसीकरण,कुपोषण कामे. कार्यसन क्रमांक श्रीमती एल.बी. मानवटकर, सार्वजनिक आरोग्य परीचर्या---,,------,,---
२८कुंटुंब कल्याण चे सपुर्ण कामे कार्यसन क्रमांक श्री.एन.आय.खान आ.पर्य.---,,------,,---
२९वैद्यकिय परीपुर्ती देयके ,वाहन संबधि,लघुलेखकाचे अतिरीक्त कार्यभार सांभाळणेकार्यसन क्रमांक श्री.ए.वाय.तुरकर, आरोग्य सहारूयक---,,------,,---
३०मानव विकास कार्यक्रमकार्यसन क्रमांक श्री.एच.आर. भांडारकर, आरोग्य सहारूयक---,,------,,---
३१नियोजन आरोग्य विभागा अंतर्गत प्रा.आ.केंद्राचे बांधकामेकार्यसन क्रमांक २७ श्री.पि.एस. राठोड, आरोग्य सेवक---,,------,,---
३२वैद्यकिय परीपुर्ती देयके सादर करणे, शासन स्तरावरिल अनुदान बिडीएस प्रणालीव्दारे काढणे.कार्यसन क्रमांक २६ श्री.व्ही.बी. निंबांर्ते, आरोग्य सेवक---,,------,,---
३३आरोग्य समिती,वईतर समितीचे कामे कार्यसन क्रमांक श्री ए.बी.बुरडे आ.से.---,,------,,---
३४शितसाखळीचे संपर्ण कामे कार्यसन क्रमांक श्रीमती सी.जे. भुतांगे, आरोग्य सेविका---,,------,,---
३५आस्थापना विषयक कामे कार्यसन क्रमांक ४ श्री.ए.ए.तिडके क.स.---,,------,,---

मातृत्व अनुदान योजना

राज्य शासनाच्या ग्रामीण भागात सुरु करण्यात आलेली मातृत्व अनुदान योजना ही सन 2004-2005 पासून चंद्रपूर जिल्हयात कार्यान्वीत करण्यात आलेली आहे.सदर योजनेचा लाभ नवसंजीवन योजनेंतर्गत आदिवासी गरोदर मातांना अनुज्ञेय आहे.
योजनेचा उद्देश :- जिल्हयातील आदिवासी मातांचे आरोग्य सुदृढ राहणे, महिलांचे आरोग्य संस्थामध्ये होणा-या प्रसूतीचे प्रमाण वाढविणे,जिल्हयातील माता मृत्यू व अर्भक मृत्यू कमी करणे.
लाभार्थी निकष :- 1) सदर गर्भवती महिला ही आदिवासी असावी व ती ग्रामीण भागातील असावी. आदिवासीचे प्रमाणपत्र किंवा शिधापञिका सादर करावे लागेल. सदर कागदपत्र उपलब्ध नसल्यास सबंधीत ग्रामपंचायतीने दिलेले प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. 2 ) सदर महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करतांना कमीत कमी 19 वर्षे असावे. 3) सदर योजनेचा लाभ हा तिन जिवंत अपत्य पर्यंत देय राहील. (2 जीवंत व सध्या गरोदर )
लाभाचे स्वरुपः- पात्र आदिवासी गरोदर मातेस एकुण रुपये 400/- धनादेशाचे स्वरुपात व रुपये 400/-औषधी स्वरुपात आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
अर्ज करण्याची पध्दतः- पात्र गर्भवती लाभार्थीने जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन आरोग्य सेविकेकडे प्रसूतीपूर्व नोंदणी करुन घ्यावी.
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे - 1) अनुसुचित जमाती मध्ये असल्याबाबतचा जातीचा दाखला. 2) ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला.

साविञीबाई फुले कन्या कल्याण योजना

स्ञियांचा सामाजिक दर्जा उंचाविण्याच्या दृष्टीने व समाजामध्ये रुढ असलेली मुलाच्या हव्यासाची प्रथा कमी करण्याच्या दृष्टीने एकही मुलगा नसतांना केवळ एक अथवा दोन मुलीनंतर कुटुंब नियोजनाची शस्ञक्रीया करुन घेवून आपले कुटुंब मर्यादित ठेवित आहेत. अशा जोडप्यांसाठी व त्यांच्या मुलीकरिता शासनाकडून साविञीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ दिल्या जातो. 
योजनेचा उद्देश :-शासनाने जाहीर केलेल्या महिला धोरणांतर्गत स्ञियांचा सामाजिक,मानसिक,शारिरीक दर्जा सुधारणे,बाळ जिवीत व सुरक्षित मातृत्वाच्या कार्यक्रमाचा प्रचार करणे,राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत छोटया कुटुंबाचा स्विकार होवून त्या अनुषंगाने वाढत्या लोकसंख्येवर नियंञण ठेवणे.
लाभार्थी   निकषः-  1) सदर लाभ फक्त महाराष्ट्र राज्यात अधिवासी कुटुंबानाच देय आहे. 2) सदर योजनेचा लाभ फक्त दारिद्रय रेषेखालील नोंद झालेल्या कुटुंबातील लाभार्थ्यानाचा देय आहे. 3) पती किंवा पत्नीने केलेली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया राज्यातील शासन मान्य संस्था अथवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक रुग्णलयात दिनांक 1 एप्रिल 2007 रोजी अथवा तद्‌नंतर केलेली असावी. 5) पती किंवा पत्नीपैकी यापुर्वी कोणीही निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केलली नसावी.सदर योजना योजनेच्या लाभार्थीना फक्त एक अथवा दोन मुली असाव्यात परंतु मुलगा मात्र नसावा.
 लाभाचे स्वरुप :- 
1) 12 ऑक्टोंबर 2001 च्या शासन निर्णयाप्रमाणे 2001 पासून एक मुलगी असल्यास रुपये 10,000/-ची व दोन मुली असल्यास प्रत्येकी रुपये 5,000/- युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ची 18 वर्षापर्यंतची मुदत ठेव . 2) 24 एप्रिल2007 च्या शासन निर्णयाप्रमाणे 
अ) एका मुलीनंतर शस्ञक्रीया केलेल्या व्यक्तीस रुपये 2,000/- रोख व मुलीच्या नावे रुपये 8,000/- राष्ट्रीय बचत प्रमाणपञ स्वरुपात. 
ब) दोन मुलीनंतर शस्ञक्रीया केल्यास शस्ञक्रीया केलेल्या व्यक्तीस रुपये 2000/-रोख व प्रत्येक मुलीच्या नांवे रुपये 4,000/- याप्रमाणे रुपये 8,000/-ची राष्ट्रीय बचत प्रमाणपञ स्वरुपात.+
अर्ज करण्याची पध्दतः-  लाभार्थ्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद,चंद्रपूर यांच्याकडे सदर योजनेच्या अर्जाचे नमुने विनामूल्य मिळतील.एक मुलगी असल्यास त्या मुलीचे वय एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि दोन मुली असल्यास, दुस-या मुलीचे वय 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्जदारास वरील संबंधीत अधिका-याकडे अर्ज मिळतील व उक्त अर्जात संपूर्ण माहिती भरुन सदर अर्ज खालील कागदपत्रासह वर नमुद केलेल्या संबंधीत अधिकाऱ्यांकडे लाभार्थीने शस्ञक्रीया केल्यापासून 3 वर्षाच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे -

 1. विहित नमुन्यात भरलेला अर्ज.
 2. शस्ञक्रीयाकेल्यासंबंधीचे प्रपञ -ब विहित नमुन्यातील वैद्यकीय अधिकार्यांपचे प्रमाणपञ.
 3. शिधावाटप पञिकेची प्रत.
 4. शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत माध्यमिक परिक्षा उत्तीर्ण झाल्याचा दाखला किंवा ग्रामपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिकेने दिलेले जन्माचे प्रमाणपञ यापैकी कोणत्याही एका प्रमाणपञाची प्रत.
 5. ग्रामीण भागाकरिता गट विकास अधिकारी किंवा तहसिलदार यांनी सदर कुटुंब,दारिद्रय रेषेखालीलकुटुंबाच्या यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत दिलेल्या प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत.
 6. शहरी भागाकरिता नगरपालिका/महानगरपालिका यांनी सदर कुटुंब ,दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत दिलेल्या प्रमाणपञाची प्रत.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा

 1. नागरीकांची सनद
 2. मा. लोकआयुक्त व उपलोकआयुक्त प्रकरणांची स्थिती
 3. न्यायालयीन प्रकरणांची स्थिती
 4. वर्ग-३ व ४ कर्मचार्यांना बाबत सहारूयक आयुक्त ;चौकशीद्ध यांच्याकडुन प्राप्त चौकशी अहवालानुसार केलेली कार्यवाहीबाबत अहवाल
 5. निलंबीत कर्मचऱ्याबाबतची माहिती
 6. अनाधिकत्रत गैरहजर कर्मचऱ्याबाबतची माहिती
 7. सेवा निवत्रत्त कर्मचाऱ्याची माहिती
 8. आरोग्य विभाग कार्यालय व अधिनस्त कार्यालयातील अधिकारी+ कर्मचारी यांची मंजुर भरलेली व रिक्त