जलव्यवस्थापन व स्वच्ठता समिती २०१२-१३

अ. क्र सदस्यांचे नांव निवडून दिल्याची तारीख स्विकृत केल्याची तारीख समितीचे पद
सौ. वंदना रविंद्र वंजारी, अध्यक्षा १५.०७.२०१०१५.०१.२०१३ सभापती
श्री रमेश काशिराम पारधी, उपाध्यक्ष तथा सभापती बांधकाम, शिक्षण व क्रिडा समिती१५.०७.२०१०१५.०१.२०१३पदसिध्द सदस्य
श्री अरविंद मनोहर भालाधरे, सभापती समाज कल्याण समिती १५.०७.२०१०२५.०१.२०१३पदसिध्द सदस्य
श्री संजय गाढवे, सभापती आरोग्य व अर्थ समिती१५.०७.२०१० २५.०१.२०१३पदसिध्द सदस्य
सौ. रेखाताई रविकिरण भुसारी, सभापती महिला व बालकल्याण समिती १५.०७.२०१०२५.०१.२०१३पदसिध्द सदस्य
श्री संदीप टाले, सभापती कृषि, पशुसंवर्धन व दुग्ध समिती१५.०७.२०१० २५.०१.२०१३पदसिध्द सदस्य
श्री राजेश ब्रिजलाल पटले, सदस्य१५.०७.२०१०१५.०१.२०१३ सदस्य
श्री प्रकाश हरिश्चंद्र देशकर, सदस्य १५.०७.२०१०१०.०८.२०१० सदस्य
सौ. मंगला रामराव कारेमोरे, सदस्या१५.०७.२०१०१०.०८.२०१० सदस्य
१०सौ. गिताताई शरद कापगते, सदस्या १५.०७.२०१०२७.०२.२०१३ सदस्य
११श्री नितीन दयानंद कडव, निरंक स्विकृत सदस्य
१२श्री केशवराव सिताराम मांडवटकर, निरंक स्विकृत सदस्य
१३श्री सुर्यभान नत्थुजी सिंगनजुडे निरंक२८.०९.२०१०स्विकृत सदस्य
१४सौ. नलु अचित दोनाडकरनिरंक २८.०९.२०१०स्विकृत सदस्य
१५श्री एन.के.जेजुरकर,अति.मु.का.अ.सदस्य सचिव
१६सौ. मंजुषा ठवकर, उप मु.का.अ. (पंचायत) सदस्य
१७श्री एस.एन. यादव, का.अ. ल.सिं. सदस्य
१८श्री एस.एस. सुशिर, का.अ. ग्रा.पा.पु.सदस्य

माहितीचा अधिकार अधिनियम २००५

काय'ाचा उद्देश :-

  1. प्रगल्भ लोकशाहीसाठी माहीतगार नागरिक व नागरिकांचे समुह घडविणे.
  2. नागरिकांचा शासन कारभाराचा सहभाग वाढविणे
  3. राज्यकारभारात पारदर्शकता व खुलेपधा निर्माण करणे
  4. शासन यंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रती उत्तरदायित्व निर्माण करणे
  5. राज्यकारभार व व्यवस्थेतील भ्रष्टाचारास आळा घालणे.
  6. माहिती मिळविण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा उभारणे.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये लघु सिंचन विभागात माहिती अधिकारी बाबत खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यंात आलेले आहे.

अ क्र अधिकारी नाव
अपीलीय अधिकारी श्री एस.एन. यादव, प्र. कार्यकारी अभियंता (ल.सिं.) जि.प.भंडारा
माहिती अधिकारी श्री ए.एम.आजनकर, प्र. उपकार्यकारी अभियंता, (ल.सिं.) जि.प.भंडारा
सहा. माहिती अधिकारी श्री ए.ए.कानतोडे, प्र. कक्ष अधि. (ल.सिं.) जि.प.भंडारा.

नागरिकांची सनद

अ.क्र. सेवेचा तपशील सेवा पुरविणारे अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव व हुद्या सेवापुरविण्याची विहीत मुदत सेवा विहीत मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव
लघु पाटबंधारे विभागतील सर्व प्रकारची योजना व कामे श्री एस.एन. यादव प्र. कार्यकारी अभियंता ७ दिवस अति. मुख्य कार्यकारी अधिकारी
लघु पाटबंधारे विभागातील सर्व प्रकारची योजना व कामे सांभाळणे, माहिती अधिकारा अंतर्गत माहिती देणे, स्थानिक विकास अंतर्गत कामे आणि मग्रारोहयो, सिंचन विहिरी श्री ए.एम. आजनकर, शाखा अभियंता तथा उपकार्यकारी अभियंता, माहिती अधिकारी ७ दिवस कार्यकारी अभियंता
साठवण बंधारे, को.प.बंधारे, ल.पा.तलाव, १३ वा वित्त आयोग अतिवृष्टी, डावी कडवी योजना अंतर्गत साठवण बंधारा, आर.आर. आर. अंतर्गत कामे श्री आर.एस.चकोले सहा. अभियंता- श्रेणी २ ७ दिवस कार्यकारी अभियंता
राष्ट्रीय कृषि विकास योजना, विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम अंतर्गत दुरुस्ती कामे, बी.आर.जी.एफ अंतर्गत कामांची तांत्रिक तपासणी करणे, जिल्हा पुस्तिका तयार करणे, मा.मा. तलाव ए.टी.आर. जवाहर सिंचन विहीर, मा.मा.तलाव सर्वेक्षण, राज्य स्तर जिल्हा पुस्तिका श्री एल.डब्लु. हेडाऊ शाखा अभियंता ७ दिवस कार्यकारी अभियंता
कार्यालयीन लिपीकाकडून प्राप्त नस्तीवर आस्थानेशी निगडीत नस्तीवर कार्यवाही कार्यालयीन दप्तर तपासणी कोर्ट प्रकरणावर मार्गदर्शन, कार्यालयीन कर्मचार्यावर नियंत्रण श्री ए.ए. कानतोडे, प्र. कक्ष अधिकारी ७ दिवस कार्यकारी अभियंता
प्राप्त अनुदान विनिमय बांधकामाच्या मोजमाप पुस्तिका तपासणे देयके तपासणे श्री ए.ए. कानतोडे, सहा. लेखा अधिकारी ७ दिवस कार्यकारी अभियंता
चित्रशाखा रोजगार हमी योजनेअंतर्गत जवाहर सिंचन विहिरी, भुसंपादन शाखेसंबंधी पत्रव्यवहार, ल.पा. योजनेची माहिती, पाणी वापर सहकारी संस्था, स्थापन करणे, खरीप आढावा, आरेखकाला सहाय्य करणे श्री आर.एम. हेडाऊ, कनिष्ठ आरेखक ७ दिवस
भांडारपाल, स्थानिक विकास कार्यक्रम श्री पी.आर. गजभिये वरिष्ठ सहा. लेखा ७ दिवस कार्यकारी अभियंता
आस्थाना विषयक संपूर्ण कामे श्री ए.डी. भलावी वरिष्ठ सहा. आस्था ७ दिवस
१० निविदा/ अंकेक्षणाची कामे श्री एस.एस.बडगे कनिष्ठ सहा. ७ दिवस कार्यकारी अभियंता
११ रोखपाल/लेखा आक्षेप श्री पी.डी.घाटे कनिष्ठ सहा. ७ दिवस
१२ आवक- जावक शाखेची कामे श्रीमती निता अ. सेन कनिष्ठ सहा. १ दिवस कार्यकारी अभियंता
१३ बजेट शाखा श्रीमती उषा दि. कुडवे ७ दिवस

लघु सिंचन विभाग रचना

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा
कार्यकारी अभियंता, लघु सिंचन विभाग, जिल्हा परिषद, भंडारा
शाखा अभियंता
सहा. लेखा अधिकारी अधिक्षक
वरिष्ठ सहा. ( लेखा) वरिष्ठ सहा. ( आस्था)
कनिष्ठ सहा. (लेखा) कनिष्ठ सहा. (आस्था)
आरेखक
कनिष्ठ. आरेखक

विभागाच्या योजना

विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम :-
भंडारा जिल्हयांमध्ये सध्याच्या सर्वेक्षणानुसार १०२५ मा.मा.तलाव अस्तित्वात आहेत. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत विदर्भातील ११ जिलंिचा समावेश करण्यंात आलेला आहे. विदर्भ हा औ'ोगिक व कृषि उत्पादनाच्या बाबतीत मागास राहिला आहे. विदर्भात कमी व बेभरवशाचे पर्जन्यमान तसेच सिंचन सुविधांचा अभाव, जमिनीतील सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, पिकावरील किड व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेती उत्पादनाबाबत शाश्वती देता येत नाही. विदर्भातील शेतीची पीक उत्पादकता देशाच्या तसेच राज्याच्या उर्वरित भागाच्या तुनलेत खुप कमी आहे. त्यामुळे विदर्भात शेती खर्चीक ठरत असून सदर शेतीत आर्थिकदृष्टया फायदेशी ठरेल याची शाश्वती नाही. त्यामुळे शेती व्यवसाय करणे जोखमीचे झाले आहे, असे निष्कर्ष शेती संदर्भात विविध स्तरावरील समित्यांचे अहवाल, संशोधनातील निष्कर्ष व कृषि तज्ञांच्या क्षेत्रीय भेटीचे अहवालात काढण्यांत आले आहे.

वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन विदर्भातील शेती फाय'ांत आणण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने केंद्रशासनाने विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम – २०१२ हा कालबध्द कार्यक्रम हाती घेऊन राबविण्याचे निश्चित केले आहे. केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम सध्या चालू असलेल्या रार्ष्टीय कृषि विकास योजनेचाच भाग असून सदर कार्यक्रमाचा कालावधी पाच वर्षाचा आहे.

महाराष्ट्र शासन जलसंधारण विभाग शुध्दीपत्रक क्रमांक विविका-२०१२/प्र.क्र.०३/जल-१ दिनांक २६ नोव्हेंबर २०१३ नुसार विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमात भंडारा जिलचिा समावेश करण्यंात आलेला आहे. त्या अन्वये लघु सिंचन विभाग, जिल्हा परिषद, भंडारा मार्फत दिनांक २५.११.२०१३ ला सन २०१३-१४ च्या कामांचे नियोजन शासनांस सादर केले त्यामध्ये राष्ट्रीय कृषि विकास येाजनेतील प्रगतीपथावरील ५४ मा.मा.तलाव दुरुस्तीची कामे रुपये १८०.०० लक्ष , व मा.मा.तलाव दुरुस्ती (सिंचन क्षमता पुनःस्थापित करणे) १५६ कामाकरिता रुपये १८५४.७२ लक्ष असे एकूण २१० मा.मा.तलाव दुरुस्तींच्या कामाकरिता एकुण रुपये २०३४.७२ लक्ष चे नियोजन शासनांस सादर करण्यंात आले होते.

महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक विविका-२०१३/ प्र.क्र.४४६/जल-१

दिनांक २० फेब्रुवारी २०१४ नुसार घालून दिलेल्या ११ अटीेच्या अधिन राहून राष्ट्रीय कृषि विकास योजनेतील प्रगतीपथावरील ५४ मा.मा.तलाव दुरुस्ती, १०८ नविन मा.मा.तलाव दुरुस्तींची कामे ( साकोली व तुमसर तालुका वगळून) , तसेच पाणी वापर सहकारी संस्था स्थापन करणे १० कामे, असे एकुण १७२ कामांसाठी रुपये १४६३.१२ लक्ष चे नियोजन मंजूर करण्यांत आले आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत प्रगतीपथावरील ५४ मा.मा.तलाव दुरुस्तींचे कामे पुर्ण करण्यासाठी दिनांक २४.०२.२०१४ ला एकुण १५०.०० लक्ष चा निधी प्राप्त झालेला आहे. तसेच नविन १०८ मा.मा.तलाव दुरुस्तींच्या कामांचे अंदाजपत्रके व आराखडे तयार करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

मागासक्षेत्र विकास अनुदान निधी :-
मागासक्षेत्र विकास अनुदान निधी अंतर्गत ची कामे पंचायत समिती स्तरावर राबविण्यांत येतात. पंचायत समितीचे नियोजनातील कामांना तांत्रिक मान्यता या विभागाद्वारे प्रदान केली जाते. आतापर्यंत या विभागाद्वारे ४ कामांना तांत्रिक मान्यता प्रदान करण्यंात आलेली आहे.


स्थानिक विकास कार्यक्रम (खासदार निधी/आमदार निधी) :-
स्थानिक विकास कार्यक्रम (खासदार निधी/ आमदार निधी) कार्यक्रमाअंतर्गत पाणवठा बांधकाम/ बंधार्याची कामे घेण्यंात येतात. सन २०१३ – १४ वर्षात स्थानिक विकास कार्यक्रम (खासदार निधी) अंतर्गत मौजा वांगी तालुका साकोली येथे १ साठवण बंधारा बांधकाम भौतिकदृष्टया पूर्ण करण्यात आले आहे.


महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना :- ५० टक्के यंत्रणा स्तर
अ) लघु सिंचन विभाग, जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत सदर योजने अंतर्गत आतापर्यंत ४५ कामे पूर्ण करण्यंात आलेली आहे. खालीलप्रमाणे ३ कामे प्रगतीपथावर आहे व ३ कामे मंजूर असून सुरु करण्याची कार्यवाही करण्यंात येत आहे.

अ.क्र. योजनेचे नांव तालुका अंदाजित किंमत झालेला खर्च निर्मित मजूर क्षमता शेरा
ल.पा.तलाव गराडा नहर नुतनीकरण भंडारा ४.९७ १.७० २४८० अकुशल काम पूर्ण
ल.पा.तलाव कन्हाळमोह नहर नुतनीकरण भंडारा ४.१७ १.५१ १४२६ अकुशल काम पूर्ण
ल.पा.तलाव गोंडीशिवनाळा नहर नुतनीकरण पवनी २५.८४ १४.४४ १९१०५ अकुशल काम पूर्ण
ब) मंजूर पण सुरु न झालेली कामे :-
अ.क्र. योजनेचे नांव तालुका अंदाजित किंमत झालेला खर्च निर्मित मजूर क्षमता शेरा
साठवण बंधारा आसगांव गाईड बंडचे बांधकाम पवनी ०.७५ २५ ५९७
ल.पा.तलाव निलागेंदी नहराचे उर्वरित बांधकाम लाखनी ३.७५ ५० ३५७१
को.प.बंधारा जांभळी सडक विशेष दुरुस्ती साकोली २४.०६ १०० १००८८

रोजगार हमी योजनेअंतर्गत जवाहर विहीर कार्यक्रम :-
रोजगार हमी योजनेअंतर्गत आतपर्यंत ७५६३ विहिरींची कामे पूर्ण झालेली असून १७६ विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. सन २०१३-१४ करिता रुपये ८२.७२ लक्ष निधी मंजूर करण्यांत आलेला असून त्यामधून अपूर्ण असलेली विहिरींची कामे पूर्ण करण्यंात येईल.
1) योजनेच्या ठळक बाबी :-
2) योजनेचे उद्दिष्ट :- पावसाचे पाण्यावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतकर्याचे शेतामध्ये विहीर खोदून त्यांचे जिवनमान उंचाविण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत जवाहर विहरीच्या योजनेची सुरुवात सन १९९२-९३ पासून करण्यांत आलेली आहे.
योजनेसाठी पात्र लाभार्थी :- रोजगार हमी योजने अंतर्गत जवाहर विहिरीचे लाभार्थी निवड संदर्भात सध्याचे प्रचलित शासन निर्णयानुसार ३ प्रवर्ग देण्यंात आलेले आहे. जिल्हयाला प्राप्त होणारे उद्दिष्ट खालीलप्रमाणे ३ प्रवर्गामध्ये विभागण्यांत येते.

अ.क्र. प्रवर्ग एकूण लक्षांकापैकी टक्केवारी
मागासवर्गीय अल्पभूधारक ( ०.६० ते २.०० हेक्टर) र्क्षेत्र २० टक्के
अमागासवर्गीय अल्पभूधारक (०.६० ते २.०० हेक्टर) ४० टक्के
नाबार्ड प्रवर्ग ( २.०० ते ४.०० हेक्टर क्षेत्र) ४० टक्के

अंमलबजावणी लक्षांकाप्रमाणे लाभार्थी निवड प्रक्रिया योजनेतून लाभ घेणारे इच्छुक लाभार्थी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित ग्राम पंचायतीकडे सादर करतात. सदर अर्ज ग्राम ंपचायतीकडून संबंधित पंचायत समितीला सादर केल्यानंतर अर्जाची छाननी केली जाते. व पात्र लाभार्थ्याची यादी तयार करुन संबंधित शेतकर्यांचे गटामध्ये पुर्वीची सिंचनाची सोई (जुनी विहिर, तलावाचे पहर, नाला इत्यादी) उपलब्ध नसल्याची खात्री करुन घेण्यासाठी सदरची यादी कृषि कार्यालयाकडे पाठवून क्षेत्रिय पाहणी केली जाते. त्यानंतर क्षेत्रिय पाहणीत पात्र ठरलेल्या लाभार्थ्याची यादी तालुका समन्वय समितीच्या सभेमध्ये सादर करुन तालुका समन्वय समितीच्या शिफारशीसह तालुक्यांत देण्यांत आलेल्या लक्षांकाच्या दुप्पट पात्र लाभार्थ्याची यादी जिल्हा स्तरावर कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, भंडारा यांचेकडे पाठविली जाते. प्रस्तुतची यादी मा. पालकमंत्री महोदय यंाचे अध्यक्षतेखाली जवाहर विहीर लाभार्थी निवड जिल्हा समन्वय समितीच्या सभेसमोर ठेऊन त्यांस तालुक्याच्या लक्षांकाप्रमाणे लाभार्थ्याची निवड केली जाते. सदर सर्व प्रक्रियेसाठी १४१ दिवसांचा कालावधी विहीत करण्यांतय आलेला आहे.

प्रशासकीय व तांत्रिक मान्यता :- जवाहर विहीर जिल्हा निवड समितीने मंजूरी दिलेल्या लाभार्थ्याची यादी गट विकास अधिकारी यांना देऊन यादी प्रस्तावासह उपविभागीय अभियंता/अधिकारी, जिल्हा परिषद ल.पा. उपविभाग, यांना कळविली जाते. उपविभागीय अभियंता/अधिकारी, जि.प.ल.पा. उपविभाग हे प्रस्ताव निहाय अंदाजपत्रक तयार करुॅन त्यांस तांत्रिक मान्यता दिल्यानंतर कार्यारंभ आदेश देतात.

काम करुन घेण्याची कार्यपध्दती :- प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिल्यानंतर संबंधित शेकर्याकडून पुन्हा ७/१२, ८अ इ.दस्ताऐवज घेऊन संबंधित लाभार्थी पात्र असल्याची खात्री करुनच लाभार्थ्याकडून विहीत नमुन्यात रुपये १००/- चे स्टँप पेपरवर करारनामा करुन घेतला जातो. कामाची आखणी देऊन काम सुरु करण्यासाठी मंजूर अनुदानाच्या १० टक्के इतकी रक्कम अग्रीम लाभधारकांस देण्यांत येते.

त्यानंतर वेळोवेळी कामांना भेट देऊन संबंधित कनिष्ठ/शाखा अभियंता हे मोजमापे घेऊन झालेल्या कामांचे मोजमापे नोंदवून लाभार्थ्यास गट विकास अधिकारी यांचे मार्फत धनादेशाद्वारे रक्कम अदा केली जाते. सध्याचे प्रचलीत शासन आदेशानुसार विहीर मंजूर झाल्यानंतर दोन महिन्यांत लाभार्थ्याने विहीरीचे काम सुरु करणे आवश्यक असून एकूण १४ महिन्यांत लाभार्थ्याने विहिरीचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. तथापी अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यासाठी शासनाकडून वेळोवळी मुदतवाढ देण्यांत येते. अनुदान/निधी वाटपाबाबत :- सन १९२-९३ मध्ये सुरुवातीला सदर विहिरी योजनेसाठी रुपये २२,५००/- इतके अनुदान होते. ते त्यानंतर वेळोवेळी वाढवित जाऊन १० एप्रिल २००८ पासून रुपये १,००,०००/- करण्यंात आले आहे.