आस्थापना

जिल्हा परिषदेचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी हे विभाग प्रमुख असुन सदर विभागावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रत्यक्ष नियंञन आहे.

जिल्हास्थर

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो)
गटविकास अधिकारी (नरेगा)
सहाय्यक लेखा अधिकारी
वरिष्ठ सहाय्यक
जिल्हा एमआयएस समन्वयक(कंत्राटी)
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी)
क्लर्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटर (कंत्राटी)
-----------------------------------------------
तालुकास्तर

माहिती अधिकार

 
माहिती अधिकारी – सौ.एस.एस.लांजेवार
गटविकास अधिकारी (नरेगा) प्रभारी
 
अपिलीय अधिकारी :- श्रीमती . नूतन सावंत
उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो)
 

विभागाच्या योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून समृद्ध महाराष्ट्र

योजनेचे उददेश


आपल्या महाराष्ट्रात विधानपरिषदेचे तात्कालीन कै.वि.स.पांगे यांच्या संकल्पनेतुन 1972 च्या भिषण दुष्काळामध्ये मजुरांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी " गरज ही शोधाची जननी आहे." या उक्तीनुसार रोजगार हमी योजनेच्या जन्म झाला.ग्रामीण भागाचे सुयोग्य विकासाचे धोरण आखुन उपलब्ध मानवी संपत्तीव्दारा ग्रामीण भागात टिकाऊ सामुहीक मालमत्ता निर्माण करीत असतांना ग्रामीण भागात राहणाऱ्या व अंगमेहनतीची अकुशल कामे करणाऱ्या मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा या उददेशाने केंद्र सरकारने "राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम 2005 पारीत केला असून देशात सर्वप्रथम आपल्या राज्यात सुरु केलेली ही योजना भंडारा जिल्हात लागु केली. दिनांक 1 एप्रिल 2008 पासुन हि योजना संपुर्ण देशात लागु झाली.त्यानंतर या योजनेचे नामकरण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र असे करण्यात आले. या योजनेचे मुख्य दोन उद्येश म्हणजे ग्रामीण भागात अकुशल रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच शाश्वत संसाधनाची निर्मीती करणे असे आहे. या योजने अंतर्गत कृषी , जलसंधारण, ग्रामविकास, सिंचन , स्वच्छता इत्यादी क्षेत्रात अनेक वैयक्तीक व सार्वजनिक लाभाची कामे हाती घेण्यात येतात. दशवार्षिक सुक्ष्म नियोजन - सन 2022-23 करीता समृद्ध बजेट आराखडा “मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर मी समृद्ध” पर्यायाने जिल्हा व महाराष्ट्र समृद्ध ह्या धोरणाअंतर्गत “लखपती कुटूंब” या संकल्पनेवर तयार करण्यात येत आहे. समृद्धी बजेट हा प्रत्येक मातीच्या कणातुन अधिक पैसा व प्रत्येक पाण्याच्या थेंबातुन अधिक पैसा, मागेल त्याला काम ऐवजी पाहिजे ते काम, या सकंल्पनानुसार कुटूंब समृद्धी व गाव समृद्धी असे अनेक बदल करुन समृद्धी बजेट तयार करण्यात आले आहे. सदर समृद्ध बजेट प्रत्ये‍क कुटूंब केंद्रीत असुन प्रत्येक कुटूंबाच्या गरजेनुसार कामे दशवार्षिक सुक्ष्म नियोजन आराखड्यात समाविष्ट करण्यासंबंधाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नियोजन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कुटूंबाची गरज लक्षात घेता सदर उपक्रम कुटूंबाचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तसेच शासन निर्देशानुसार दशवार्षिक सुक्ष्म नियोजन गावनिहाय तयार करण्यासाठी प्रशिक्षणार्थीं (मानव संसाधन चमु) तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सात तालुक्यातील प्रत्येकी 2 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली असुन दिनांक 18/04/2022 ते 30/04/2022 या कालावधीत मानव संसाधन चमू पूर्णवेळ मुक्कामी राहुन दशवार्षिक सुक्ष्म आराखडा तयार केला आहे. जिल्हास्तरावरुन मानव संसाधन चमूचे गठन करण्यात आले असुन. प्रत्येक पंचायतीमध्ये क्षेत्र भेटीच्या माध्यमातुन नियोजन सुचनेनुसार सुरु असल्याची खात्री त्यांच्याकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या 14 ग्रामपंचायतीची दशवार्षिक सुक्ष्म नियोजन आराखडा प्रक्रिया पूर्ण झाली असुन ग्रामपंचायत स्तरावर नियोजनाप्रमाणे कामे सुरु आहेत आतापर्यंत 6 ग्रामपंचायती अंतर्गत एकूण 18 कामे सुरु करण्यात आलेली आहेत. सदर कामात तलाव खोलीकरण , भातखाचरे पुर्नजिवन-, नाला सरळीकरण, गुरांचा गोठा, नॅडेप, व्हर्मी कंम्पोस्ट व शोष खड्डे या कामांचा समावेश आहे . सदर प्रक्रियेत जिल्हास्तरावरील चमु, तालुकास्तरीय सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, ग्रामरोजगारसेवक व ग्रामपंचायतीमधील सरंपच, इतर पदाधिकारी व प्रतिष्ठीत लोकांचे पुर्णपणे सहकार्य लाभत आहेत. प्रक्रिया सुलभ व चांगल्या पद्धतीने पार पाडण्याकरीता जिल्हास्तरावरुन प्रतिदीन संनियंत्रण ठेवण्यात येत


समृद्ध महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतुन मागेल त्याला / तिला काम, मागेल तेव्हा काम , मागेल तितके कामे, पहिजे ते काम, केलेल्या कामाचे दाम

गावाच्या समृद्धीसाठी सार्वजनिक लाभाची कामे (1) वनतळे (2) वृक्ष लागवड (3) माती नालाबांध (4) गावतलाव (5) ग्रामपंचायतसाठी विहीर (6) रस्ता (7) वृक्षरोपण (8) क्रीडांगण (9) भूमिगत बंधारे (10) जलाशयातील गाळ काढणे (11) रोपवाटीका (12) जंगलातील जाळरेषा (13) कालव्याचे नूतनीकरण (14) वनबंधारे (15) पडिक (गायरान) जमिनीवर वृक्ष लागवड (16) बंधारे (17) रस्त्याच्या दतर्फा वृक्ष लागवड (18) वृक्ष संगोपन (19) सलग समतल चर (20) सार्वजनिक वनजमीन पटटयांचा विकास (21) मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पांदन रस्ते योजना (22) अमृत सरोवर

लाक्षाधीश होण्यासाठी ; वैयक्तिक लाभाची कामे
(1) सिंचन विहीर (2) रोपवाटीका (3) शोषखडडा (4) फळबाग (5) व्हमी कंपोस्टिंग (6) शेततळे (7) नाडेप कंपोस्टिंग (8) शौचालय (9) वृक्ष लागवड (10) बांध दुरुस्ती (भातखाचरे) (11) दगडी बांध (12) घरकुल (13) सी.सी.टी (14) गोठा (15) कुक्कुटपालन शेड (16) वैयक्तीक वनजमीन पटटयांचा विकास

लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम,1977 (दिनांक 6 ऑगस्ट 2014 पर्यंत सुधारीत ) मधील अनुसुची -दोन मधील परिच्छेद-4 मध्ये नमुद करण्यात आल्याप्रमाणे वैयक्तीक लाभाची कामे देतांना खालील प्रर्वगातील कुंटुबाना प्राधान्य देण्यात येतात.
अ) अनुसुचित जाती ,ब)अनुसुचित जमाती ,क)भटक्या जमाती ,ड) निरधीसुचित जमाती, (विमुक्त जाती ) , इ) दारिद्रय रेषेखालील इतर कुंटुबे , फ) स्त्री करीता असलेली कुंटुबे , ग) शारीरिकदृष्टया विकलांग व्यक्ती करीता असलेली कुंटुबे , ह) जमीन सुधरणेची लाभार्थी , आय) इंदिरा आवास योजने खालील लाभार्थी , जे) अनुसुचित जमाती व इतर पारपांरीक वनवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006 ,( 2007 चा 2) खालील लाभार्थी उपरोक्त प्रवर्गातील पात्र लाभार्थीना प्राधान्य देण्यात आल्या नंतर,कृषी कर्जमाफी व कर्ज साहय योजना 2008 मध्ये व्याख्या केलेल्या लहान व सिमांन्त भुधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कामांना शर्तीच्या अधिनेतेने प्राधान्य देण्यात येतात.

काम मागणीसाठी अर्ज
 1. कामाची मागणी ग्रामसेवक / ग्रामरोजगार सेवक यांच्याकडे करायची व कामाच्या मागणीची पोहच घ्यायची !
 2. कामाचे मागणी केल्यावर 15 दिवसात गावातच काम सुरु होते.
 3. कामाच्या ठिकाणी मस्टरवर रोज हजेरी
 4. दर आठवडयाला कामाचे मोजमाप
 5. दर 15 दिवसाच्या आत मजुरी
 6. मजुरी आपल्या बँक किंवा पोस्टाच्या खात्यावर जमा होते
 7. आपले जवळचे पोस्ट आता आपली जवळची बँक झाली आहे.
 8. पोस्ट बँक खाते नविन खाते झिरो बॅलन्स वर काढता येईल. या खात्यातील रक्कम देणे घेणे हे व्यहार आपल्याला गावातील पोस्टमन आणि शहरातील पोस्टात देखील करता येणार आहे.


जाँबकार्ड नोंदणी बाबत.

 1. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक कडे नोंदणी करायची
 2. नोंदणी केल्यावर जाँब कार्ड मिळते
 3. जाँब कार्ड मजूर कुंटूंबाकडेच ठेवायचे आहे
 4. केलेल्या कामाची किती मजुरी मिळाली ते कळते
 5. जाँब कार्ड मजूर कुटुंबाला विनामूल्य दिले जाते
 6. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, सदस्य , ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांनी महिण्यातून दोनवेळा रोजगार दिवस भरवायचा आहे.

  कामाच्या ठिकाणी सुविधा
 • सावली
 • पिण्याचे पाणी
 • प्राथमिक औषधी उपचार पेटी
 • पाळणाघर
 • दर फलक


हेल्पलाईन नंबर

हेल्पलाईन नंबर : 1800 22 3839