वैयक्तीक योजना

वैयक्तीय लाभाच्या सर्व योजनांकरिता खालील निकष सारखे असून त्या व्यतिरिक्त आवश्यक अटी खालीलप्रमाणे रकाना क्र.३ मध्ये नमूुद आहे.

लाभार्थी अनुसूचित जाती/नवबौध्द, अनुसूचित जमाती/ विमुक्त जाती व भटक्या जमाती या संवर्गातील असावा.
समाज कल्याण समिती सभा दिनांक २६.४.२०१४ मध्ये पारीत झालेल्या सभेनुसार वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रु.३०,०००/- व अपंगाचे बाबतीत उतपन्न मर्यादेमध्ये सुट देण्यात आलेली आहे.
सक्षम प्राधिका-याचा जातीचा दाखला.
दारिद्गय रेषेखालील यादीत कुटूंबीयांचे नाव असलेल्या लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येते
लाभार्थ्याच्या कुटूंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नसावा.
एकाच योजनेचा लाभ लाभार्थ्यास एकाचवेळी दुहेरी मिळणार नाही
महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई शासन निर्णय क्र. मागास/१०९८/प्र.क्र.७३/३४, दिनांक २०.१०.१९९९ नुसार नमूद केलेल्या अटी व शर्ती लाभार्थींना बंधनकारक राहतील.
अ.क्र. योजनांचे नाव पात्रतेबाबत निकष
जि.प./खाजगी शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत दोन चाकी सायकल वाटप घरापासून शाळेचे अंतर दोन कि.मि.पेक्षा जास्त असावे व तसे मुख्यध्यापकाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, सदर योजना वर्ग-५ ते १२ वी मध्ये शिकणारे मुला-मुलीकरिता आहे
मच्छीमार व्यावसायीकांना नायलान जाळी पुरविणे. लाभार्थी हा विमुक्त जाती/भटक्या जमाती या प्रवर्गातील असावा, मासेमारी व्यवसाय करणेबाबतचा ग्रामपंचायत सचिवाचे प्रमाणपत्र आवश्यक.
मागासवर्गीय शेतक-यांना ताडपत्री पुरविणे लाभार्थी हा अल्पभूधारक शेतकरी असावा. अर्जासोबत शेतीचा सातबारा उतारा अवश्यक.

शैक्षणिक योजना.

१) इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यंत शिकणा-या मागसवर्गीय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
शासन निर्णय दि. ३१ मार्च २००५ अन्वये अनु.जाती,विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील मुलीना शिष्यवृत्ती देय आहे. या शिष्यवृत्ती करिता उत्पन्न व गुणाची अट नाही.फक्त विद्यार्थिनीची उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे. सदर शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त आहे.
शिष्यवृत्ती दर :- द.म.रु.६० प्रमाणे १० महिण्याकरिता

२) माध्यमिक शाळेतील विघार्थ्याना शिष्यवृत्ती (गुणवत्ता)
शासन निर्णय दि.१७ ऑगष्ट १९९५ व शासन निर्णय दि.९ फेब्रुवारी २००७ अन्वये १.इ.५ वी ते १० वी च्या वर्गातील अनु.जाती,अनु.जमाती,विजाभज व विमाप्र या प्रर्वगातील वर्गातुन प्रथम व द्वितीय (मागील वार्षिक परिक्षेतील गुण) पंरतु ५० टक्के पेक्षा कमी गुण नसणा-या दोन विद्यार्थ्याना(चारही प्रर्वगातुन फक्त दोनच विद्यार्थी) (मुलेमुली) निवड प्रपत्रामध्ये करावी २.सदर शिष्यवृत्ती १० महिण्याकरिता देय आहे.
शिष्यवृत्ती दर :- अनु.जाती -इ.५ वी ते ७ वी द.म.रु.५०/-, इ.८ वी ते १० वी द.म.रु.१००/-,

३) अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती
शासन निर्णय दि.१७ मार्च २००९ अन्वये १.हाताने मेहतर काम करणारे/मानवी विष्ठाचे वहन करणा-या व्यक्ती किंवा बंदिस्त व उघडया गटाराची साफसफाई करणारे व्यक्ती. २. अस्वच्छ व्यवसायाशी संमध परंपरेने असलेले सफाईगार ३. कातडी कमावणारे ४.कातडी सोलणारे इ.अस्वच्छ व्यवसाय करणा-या पालंकाच्या मुलाना शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते. या शिष्यवृत्ती करिता उत्पन्नाची व अपत्याची अट नाही सदर शिष्यवृत्ती १० महिण्याकरिता देय आहे.
शिष्यवृत्ती दर :- तदर्थ अनुदान रु.७५० वार्षिक व शिष्यवृत्ती द.म.रु ११०

४) इ.८ वी ते १० वी मध्ये शिकणा-या अनु.जातीच्या मुलीना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती देणे शासन निर्णय दि. २३ मे २००३ अन्वये अनु.जातीच्या मुलीना १० महिण्याकरिता शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते.ही शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त आहे.या शिष्यवृत्ती करिता उत्पन्नाची व गुणाची अट नाही.फक्त विद्यार्थिनीची उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे
शिष्यवृत्ती दर :-द.म.रु.१०० प्रमाणे १० महिण्याकरिता

५) शिक्षण फी परिक्षा फी
परिक्षा शुल्क :- इ.१० मध्ये शिकत असलेल्या अनु.जाती ,जमाती, विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्याना परिक्षा बोर्डाने ठरविलेल्या दराप्रमाणे प्रात्याशिक शुल्क व परिक्षा शुल्काची प्रतिपुर्ती करण्यात येते. शिक्षण शुल्क :-शासन निर्णय दि.३० डिसेंबर २०११ अन्वये मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इ.१ ली ते इ.१० वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दारिद्ग रेषेखालील कुटुंबातील अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येते
शिक्षण शुल्काचे दर :-

 1. इ.१ ली ते ४ थी द.म.रु.१०० प्रमाणे १० महिण्याकरिता
 2. इ.५ वी ते ७ वी द.म. रु.१५० प्रमाणे १० महिण्याकरिता
 3. इ.८ वी ते १० वी द.म. रु.२०० प्रमाणे १० महिण्याकरिता

६) इ.९ वी व १० मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याना मॅट्रीकपुर्व भा.स.शि.
शासन निर्णय दि.४ ऑक्टोंबर २०१३ अन्वये इ.९ वी व १० वी मध्ये शिकत असणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याना भारत सरकारची मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन २०१३.१४ या शैक्षणिक सत्रापासुन लागु केलेली आहे. सदर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. १.सदर योजना शासकीय मान्यता प्राप्त शाळेत शिकत असणा-या विद्यार्थ्यास लागु राहील.२.शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याच्या पालंकाचे उत्पन्नाची मर्यादा रु.२.०० लक्ष आहे.३.शिष्यृत्तीकरिता गुणांची अट नाही.४.सदर शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्याकरिता अर्ज करणे आवश्यक आहे.५.सदर योजनेचा लाभ केंद्गाच्या इतर माध्यमिक पूर्व शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्याना लागु नाही. ६.इ.८ वी ते १० मधिल अनु.जातीच्या मुलीना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याना हि शिष्यवृत्ती देता येणार नाही. शिष्यवृत्ती दर :- वसतिगृहात न राहणारे (अनिवासी) द.म.रु.१५० प्रमाणे १० महिण्याकरिता व पुस्तके व तदर्थ अनुदान वार्षिक रु.७५० वसतिगृहात राहणारे (निवासी) द.म. रु.३५० प्रमाणे १० महिण्याकरिता व पुुस्तके व तदर्थ अनुदान वार्षिक रु.१,००० वरिलप्रमाणे शिष्यवृत्तीशिवाय विनाअनुदानित शाळेतील अपंग विद्यार्थ्याकरिता अतिरिक्त भत्ते पुढील प्रमाणे आहेत.

 1. अंध विद्यार्थ्यासाठी वाचक भत्ता : मासिक भत्त्याची रक्कम रु.१६०
 2. वसतीगृहात न राहणा-या अपंग विद्यार्थ्याकरिता वाहतुक भत्ता : रु.१६०
 3. अपंग विद्यार्थ्याच्या सोबत्याकरिता भत्ता : रु.१६०
 4. अपंग विद्यार्थ्याच्या मदतनीसकरिता भत्ता :रु.१६०
 5. मंदबुध्दी विद्याथ्याकरिता शिकवणी भत्ता : रु.२४०

७) स्वंयसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहे
वसतिगृहाच्या ठिकाणी रहिवासी नसलेले वर्ग-५ ते १०वी मध्ये शिकत असलेले मागासर्गीय विद्यार्थी व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. (स्थानिक मांग, भंगी, गोंड व कातकरी या जातीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो इतर जातीतील स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत नाही) सदर वसतिगृहामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी/ विद्यार्थीनीकरिता मोफत राहण्याची व जेवणाची करयात येते.

अपंगांकरिता शैक्षणिक योजना.

अपंग विद्यार्थ्यांना विशेष शाळा मार्फत शिक्षण :- अपंग विद्याथीᅠअतितिव्र व अपंगत्वामुळेᅠ सामान्य मुलाबरोबरीने सामान्य शाळेत शिक्षण घेवू शकत नाही. अशा विद्यार्थ्यासाठी सामाजिक न्याय विभागाने विशेष शिक्षणाची मोफत व्यवस्था केली आहे. शासकीय तसेच संस्थामार्फत चालविल्या जाणा-या अपंगाच्या विशेष शाळेमधून दृष्टिहीन, कर्णबधिर, अस्थिविकलांग, व मनोविकलांगासाठी शिक्षणाची सोय केली आहे.
अटी व शर्ती :-

 1. विद्यार्थी हा अपंग असावा. पुर्णतः अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग, ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र
 2. अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिकृत रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र.
 3. विद्यार्थ्याचे जन्म प्रमाणपत्र/जन्माचा दाखला.
 4. वय वर्षे ६ ते १८ वयोगटातील असावे.

शालांत पुर्व शिक्षण घेणा-या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना.
१.वर्ग १ ते ४ रु.५०० वाषिक मतिमंद प्रवर्गासाठी रु.७५०/-. २. वर्ग ५ ते ७ रु.७५०/- वाषिक.३.वर्ग ८ ते १० रु.१०००/- वार्षिक शिष्यवृत्ती देय आहे.
अटी व शर्ती :-

 1. विद्याथी हा अपंग असावा. पुर्णतः अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग, ४० टक्के व त्यापेक्षा अधिक
 2. अपंगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र
 3. अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिकृत रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र.
 4. विद्याथी हा शाळेत प्रवेशित असावा-
 5. विद्यार्थ्याचे गुणपञक अर्जासोबत जोडावे.
 6. नमुना नं.ए.पी.पी.१८ सोबत जोडून गट शिक्षण अधिकारी यांची स्वाक्षरी घ्यावी.

शालांत्तोर शिक्षण घेणा-या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना.
अटी व शर्ती :-

 1. विद्याथी हा अपंग असावा. पुर्णतः अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग, ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र
 2. अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिकृत रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र.
 3. विद्याथी हा शाळेत प्रवेशित असावा.
 4. विद्यार्थ्याचे गुणपञक अर्जासोबत जोडावे.
 5. नमुना नं.ए.पी.पी.१८ सोबत जोडून गट शिक्षण अधिकारी यांची स्वाक्षरी घ्यावी.

अपंग व्यक्तिना स्वंयरोजगारासाठी बिज भांडवल योजना.
अटी व शर्ती

 1. विद्याथी हा अपंग असावा. पुर्णतः अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग, ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र
 2. अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिकृत रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र.
 3. अर्जदार बेरोजगार असावा.
 4. अर्जदार १८ ते ५० वषर्ेे वयोगटातील असावा.
 5. कुटूंंबाचे वाषिक उत्पन्न रु.१०००००/- पेक्षा जास्त नसावे.
 6. अर्जदारांना शैक्षणिक पाञता व प्रशिक्षणाची अट नाही.
 7. अर्थसहाय्य प्रकल्पाची मर्यादा रु.१५०,०००/- आहे. त्यापैकी ८०% कर्ज २०% बिज भांडवल.

अपंग व्यक्तिना पुनर्वसनासाठी वित्त्तिय सहाय्य योजना.
अटी व शर्ती :-

 1. विद्यार्थी हा अपंग असावा. पुर्णतः अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग, ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र
 2. अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिकृत रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र.
 3. अर्जदार आय.टी.आय.उत्तीर्ण असावा.
 4. अर्जदार १८ ते ३५ वयोगटातील असावा.
 5. अर्जदारास १००० ते ३००० रु. पर्यंत त्याच्या उत्पन्नाच्या आधारे अनुदान देण्यात येईल.

अपंग व्यक्तींना एस.टी प्रवास भाड्यामध्ये प्रवास सवलत.
अपंगांना या विभागामार्फत दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे एस.टी.प्रवास भाड्यामध्ये अपंग व्यक्तीस ७५%. सवलत देण्यात येते. अटी व शर्ती :-

 1. अर्जदार अपंग असावा. पुर्णतः अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग, ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र
 2. अर्जदार हा जिल्ह्याचा अधिकृत रहिवासी असल्याबाबत रहीवासी प्रमाणपत्र.
 3. वयाचा अथवा जन्म तारखेचा दाखला.

राष्ट्रीय विश्वस्त न्यास अधिनियम १९९९ कायदेशिर पालकत्व देण्याची योजना
मनोविकलांग, मेंदूचा पक्षघात झालेले व्यक्ती, बहुविकलांग तसेच आत्ममग्न व्यक्तींच्या कल्याणाच्या दृष्टीने राष्ट्रीय विश्वस्त न्यास अधिनियम १९९९ अंतर्गत कायदेशिर पालकत्व देण्यात येते.
अटी व शर्ती :- १.अर्जदार हा अपंग असावा. ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र २अर्जदार हा जिल्ह्याचा अधिकृत रहिवासी असल्याबाबत रहीवासी प्रमाणपत्र.

अपंगांसाठी सल्ला व मार्गदर्शन केंद्ग
अपंगाच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांची परिणामकारकपणे अंमलबजावणी होण्याकरिता इमारतीच्या तळमजलावर अपंग सल्ला व मार्गदर्शन केंद्ग स्थापन केलेले आहे.

अपंग व्यक्तींना कृत्रीम अवयव व साधने पुरविणे.
अटी व शर्ती :-

 1. .अर्जदार हा अपंग असावा. ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र
 2. .अर्जदार हा जिल्ह्याचा अधिकृत रहिवासी असल्याबाबत रहीवासी प्रमाणपत्र.
 3. अर्जदार यांचे मासीक उत्पन्न रु.१५००/- पर्यंत असेल तर साधने व उपकरण खरेदीकरिता १००%, उत्पन्न रु.१५०१/- ते २०००/- पर्यंत असेल तर अर्थसहाय्य ५०%.
 4. सदर योजना प्रौढ व्यक्तींसाठी ३ ते ५ वर्षातून एकदा आणि १५ वर्षाखालील मुला/मुलींना दर वर्षी लागू आहे.
 5. या अर्थसहाय्याची मर्यादा किमान २५% व कमाल रु.३०००/- अशी राहील.
 6. कृत्रीम अवयवयांच्या बाबतीत अवयव बसविण्यासाठी आकारण्यात येणा-या खर्चाच्या १५% रक्कम लाभार्थ्यास देण्यात येते.

कार्यशाळांमधुन अपंगाना व्यवसाय प्रशिक्षणः-
१८ ते ४५ वयोगटातील प्रौढ अपंग व्यक्तीना अशासकीय संस्थामार्फत चालविण्यात येणा-या कर्मशाळामधुन रोजगार व स्वयंरोजगाराचे वेगवेगळया व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
अटी व शर्ती :-

 1. विद्यार्थी हा अपंग असावा. पुर्णतः अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग, ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र
 2. अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिकृत रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र.
 3. विद्यार्थ्याचे जन्म प्रमाणपत्र/जन्माचा दाखला.
 4. विद्यार्थ्याचे गुणपञक अर्जासोबत जोडावे.
 5. . वय वर्षे १८ पेक्षा अधिक असावे.

इतर योजना

११) अस्पृश्यता निर्मुलनार्थ आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य
आंतरजाती विवाह करणा-या ज्यात अनु.जाती/जमाती/ विमुक्त जाती/भटक्या जमाती यांपैकी एक व दुसरी व्यक्ती स्वर्ण हिंदू, लिंगायत जैन, शिख यांचेतील असेल तसेच अनु.जाती/ अनु.जमाती /विजाभज यामधील आंतर प्रवर्गातील असावे. सदर योजनेअंतर्गत १.२.२०१० पासून विवाहीत जोडप्यांना रु.५०,०००/- चे रोख अनुदान मंजूर करण्यात येते.

१२) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे. (द.व.सु)
अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये राहणा-या लोकांचे राहणीमान उंचावणे, वसत्यांमध्ये स्वच्छता रहावी याकरिता लोकसंख्येच्या निकषानुसार वसत्यांमध्ये सिमेंट रोड बांधकाम, पाणी पुरवठा, नाली बांधकाम, समाज मंदीर, स्वच्छता विषयक कामे ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार मंजूर करण्यात येतात.
अटी व शर्ती :-

 1. वस्तीची लोकसंख्या १० ते २५ ला रु.२,०००,००/-.
 2. वस्तीची लोकसंख्या २६ ते ५० ला रु.५,०००,००/-
 3. वस्तीची लोकसंख्या ५१ ते १०० ला रु.८,०००,००/-
 4. वस्तीची लोकसंख्या १०१ ते १५० ला रु.१२,०००,००/-
 5. वस्तीची लोकसंख्या १५१ ते ३०० ला रु.१५,०००,००/-
 6. वस्तीची लोकसंख्या ३०१ ते पुढे ला रु.२०े,०००,००/-

कामाची मागणी ग्रामपंचायतीने खंड विकास अधिकारी यांचे मार्फत जिल्हा परिषदेकडे सादर करावी. शाहू फुले आंबेंडकर दलित वस्ती विकास व सुधारणा अभियान.
दलित वस्त्यामधील अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचावे, दलित वस्त्या स्वच्छ राहण्यासाठी तेथिल रहिवाश्यांचा सहभाग वाढवा सामाजिक विषमता नष्ट व्हावी व दलितांचे प्रश्न सोडविण्यासाठी ज्यांनी कार्य केले त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. पंचायत समिती स्तरावर कामकरणा-या पहिल्या तिन ग्रामपंचायतीवर रु.२५०००/-, रु.१५०००/-, रु.१००००/- जिल्हा स्तरावरील तिन ग्रामपंचायतींना रु.५.०० लक्ष, रु.३.०० लक्ष, रु.२.०० लक्ष दिले जाते. महसूल विभाग स्तरावर एका ग्रामपंचायतीला रु.१०.०० लक्ष संपुर्ण राज्यातील उत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायतींना रु.२५.०० लक्ष ,रु.१५.०० लक्ष , रु. १०.०० लक्ष पारीतोषिक दिले जाते.

रमाई आवास घरकुल योजना
शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील अनु.जाती व नवबौध्द द्गारिद्गय रेषेखालील कुटूंबांना शासनामार्फत घर बांधणीचे अनुदान मंजूर करण्यात येते. सदर योजना प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, भंडारा यांचे मार्फत राबविण्यात येते.

वृध्द साहित्यीक व वृध्द कलावंतांना मानधन
वृध्द साहत्यीक कलावंत ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे अशा वृध्द साहित्यीक कलाकारांची निवड समिती मार्फत निवड करुन पात्र लाभार्थ्यांची यादी शासनास सादर करण्यात करण्यात येते. शासनाकडून निवड झालेल्या वृध्द साहित्यीक कलाकारांना दरमहा रु.१०००/- इतके मानधन पंचायत समिती मार्फत अदा करण्यात येते. अर्जदार यांचे वार्षित उत्पन्न रु.२४०००/- पेक्षा जास्त नसावे. अर्जदार यांनी पंचातय समिती यांचेकडे अर्ज सादर करावे. अपंग वृध्द साहित्यीक कलाकरांना वयाची अट नाही.

आस्थापना विषयक माहिती

संवर्गनिहाय मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदे.

अ.क्र.पदाचे नावसंवर्गमंजूर पदेभरलेली पदे रिक्त पदे
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारावर्ग-१ -
कार्यालयीन अधिक्षकवर्ग-३-
सहाय्यक लेखाधिकारीवर्ग-३ -
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्तावर्ग-३-
समाज कल्याण निरिक्षकवर्ग-३-
वरिष्ठ लिपीकवर्ग-३
कनिष्ठ लिपीकवर्ग-३-
वाहन चालकवर्ग-३-
शिपाईवर्ग-४-
 एकुण १६

माहिती अधिकारी

समाज कल्याण विभागातील शासकीय माहिती अधिकारी/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी/अपिलीय अधिकारी यांची विस्तृत माहिती

अ.क्र. शासकीय माहिती अधिका-याचे नाव पदनाम कार्यक्षेत्र पत्ता/फोन क्रमांक ई.मेल अपीलीय अधिकारी
अ) शासकीय माहिती अधिकारी
श्रीमती आर एन वरंभे, सहाय्यक लेखाधिकारी समाज कल्याण विभाग, जि.प.भंडारा समाज कल्याण विभाग, जि.प. भंडारा ०७१८४-२५२३६७ - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.भंडारा.
ब) सहाय्यक माहिती अधिकारी
श्रीमती आर एन वरंभे, सहाय्यक लेखाधिकारी समाज कल्याण विभाग, जि.प.भंडारा समाज कल्याण विभाग, जि.प. भंडारा ०७१८४-२५२३६७ - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.भंडारा.
क) अपीलीय अधिकारी
श्री ए आर रामटेके जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.भंडारा. समाज कल्याण विभाग, जि.प.भंडारा समाज कल्याण विभाग, जि.प. भंडारा ०७१८४-२५२३६७ - श्रीमती आर एन वरंभे,

नागरिकांची सनद

या कार्यालयातील केली जाणारी कामे व संबंधीत अधिकारी/कर्मचारी

अ.क्र. सेवेचा तपशील सेवा पुरविणारे अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव व हुद्या सेवापुरविण्याची विहीत मुदत सेवा विहीत मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव
मासिक खर्च विवरणपत्र, अंदाजपत्रक तयार करणे, लेखा परिच्छेद व लेखा विषयक बाबींवर नियंत्रण ठेवणे, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंमलबजावणी करणे श्रीमती आर एन वरंभे, सहाय्यक लेखाधिकारी दरमहा/७ दिवस जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.भंडारा
सर्व शासकीय अनुदानित व विनाअनुदानित अपंग शाळांची कामे व अपंग शिष्यवृत्ती योजना, अपंगाकरिता बिज भांडवल योजना, अपंग व्यक्तींचे ओळखपत्र तयार करणे श्री आर जी गायकवाड, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता ७ दिवस जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.भंडारा
आस्थापना शाखा,अनुदानित वसतिगृह व रमाई आवास योजना श्री सी बी इंगोले, वरिष्ठ लिपीक ७ दिवस जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.भंडारा
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी परिक्षा फी देणे, वर्ग-८ ते १० वी अनु.जातीच्या मुलींना सावित्रिबाई फुले शिष्यवृत्ती योजना, आय टी आय च्या विद्यार्थ्यांना विद्या वेतन, आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना प्रोत्साहन, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे. (द.व.सु), व्यसनमुक्ती, वृध्दकलाकारांना मानधन, श्री एस एन बारई, कनिष्ठ लिपीक आर्थिक वर्ष तसेच तरतूद उपलब्धतेच्या अधिन राहून जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.भंडारा
वर्ग-५ ते ७ मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यावसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती श्री एस एन बारई, कनिष्ठ लिपीक वरीलप्रमाणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.भंडारा
रोखपाल, कर्मचारी वेतन देयके, कार्यालयीन खर्चाची देयके, जिल्हा परिषद सेस फंड योजना, आवक जावक विभाग. श्री डी जी भूरे, कनिष्ठ सहाय्यक (कार्यालयीन व्यवस्थेअंतर्गत कार्यरत) ७ दिवस जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.भंडारा