महिला व बालकल्याण समितीची रचना

श्रीमती रेखाताई र. भुसारी
सभापती, महिला बालकल्याण समिती
जिल्हा परिषद, भंडारा
श्री पी.जे. राठोड
सचिव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, भंडारा

सन्माननिय सदस्य -
1) सौ. ज्योती सुनिल टेंभुर्णे मु. दवडीपार, ता. भंडारा
2) सौ. शोभाताई देवानंद चांदेवार मु. सिहोरा ,ता. तुमसर
3) सौ. सविता शंकर ब्राम्हणकर मु. पळसगाव सो., ता. साकोली
4) सौ. मंजुषा आशिष पातरे मु. मोहाडी , ता. मोहाडी.
5) सौ. अनिता सुभाष तितीरमारे मु. माटोरा, ता. भंडारा.
6) सौ. नलिनी विनोद खरकाटे मु. लाखांदूर, ता. लाखांदूर.
7) श्रीमती विनाताई गजानन झंझाड मु. मोहाडी ता. मोहाडी
8) कुमारी राजश्री दादाराव गि-हेपुंजे मु. सावरी जवाहरनगर ,ता. भंडारा.

एकात्मिक बालविकास सेवा योजना

बाल्यावस्था हा मुलांच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अत्यंत महत्वाचा कालावधी आहे. जन्माला येण्यापुर्वी तसेच जन्मानंतर बालकांना पुरेशा सेवा देण्याचे राष्ट्रीय धोरण आपल्या देशाने स्वीकारले आहे. या धोरणानुसार २ ऑक्टोंबर, १९७५ साली प्रायोगिक तत्वावर बालकांचे सर्वांगीण विकासासाठी त्यांना आहार, आरोग्य व शिक्षण एकत्रितपणे देण्याचे उद्देशाने एकात्मिक बालविकास सेवा योजना सुरु करण्यात आलेली आहे
एकात्मिक बालविकास सेवा योजनेखाली खालील सहा प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात.

  1. पुरक पोषण आहार
  2. लसीकरण
  3. आरोग्य तपासणी
  4. संदर्भ सेवा
  5. आरोग्य व सकस आहार विषयक शिक्षण
  6. अनौपचारीक शालेय पूर्व प्राथमिक शिक्षण
एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे उद्देश
  1. ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचे पोषण व आरोग्य दर्जा सुधारणे.
  2. बालकांचा शारीरीक, मानसिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे.
  3. बालमुत्यू, बालरोग व कुपोषण, शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करणे.
  4. बालविकासाला चालना मिळावी म्हणून शासनाचे विविध विभागांमध्ये धोरण व अंमलबजावणी याबाबत परिणामकारक समन्वय साधणे.

योग्य पोषण व आरोग्य विषयक शिक्षणाव्दारे बालकांचे सर्वसामान्य आरोग्य व त्यांच्या पोषण विषयक गरजांकडे लक्ष पुरविणेबाबत मातांची क्षमता वाढविणे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेची व्याप्ती.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्र / प्रकल्प कार्यान्वित करणेसाठी खालीलप्रमाणे लोकसंख्याबाबतचे निकष निर्धारित करण्यात आलेले आहेत.

क्षेत्र समाविष्ठ लोकसंख्या (प्रकल्प) समाविष्