पशुसंवर्धन विभागाची महत्वाची कामे व उध्दिष्टे
![]() | गोपलकांच्या जनावरांना पशुवैद्यकीय सेवा पुरविणे. |
![]() | संकरीत गोपैदास कार्यक्रमाची अमंलबजावणी करणे. |
![]() | रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रण कार्यवाही करणे. |
![]() | कुक्कुट विकास , शेळी मेंढी विकास करणे |
![]() | वैरण विकास कार्यक्रम राबविणे |
![]() | पशुपालनातून स्वंयरोगजगार निर्मीती करणे. |
![]() | जिल्हा परिषद, राज्य शासन , केंद्ग शासनाच्या पशुसंवर्धन विषयक योजना राबविणे |
![]() | पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षाण देणे |
![]() | प्रचार व प्रसार योजना राबविणे |
अ.क्र. | व्यक्तीचे पदनाम | नांव | कार्यक्षेत्र |
१ | मा.सचिव पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास,मत्स्यव्यवसाय विभाग,मंत्रालय मुंबई ३२ | मा.श्री.महेश पाठक | महाराष्ट्र राज्य |
२ | मा.आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे-१ | डॉ.ए.टी.कुंभार | महाराष्ट्र राज्य |
३ | मा.प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त विभाग नागपूर | डॉ.मोहम्मद मोरनोददीन | नागपूर विभाग |
४ | मा.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उपआयुक्त भंडारा | डॉ.जे.के.उराडे | भंडारा जिल्हा |
५ | मा.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद | डॉ.एन.एच.चव्हाण | भंडारा जिल्हा |
पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सदस्यांचे माहिती पऋाक
अ. क्र | सदस्यांचे नांव व पत्ता | पदनाम | क्षेऋा | कालावधी | शेरा |
१ | श्री संदीप ताले, मु.पो. रोंघा, ता. तुमसर, जिल्हा भंडारा | सभापती | २.५ वर्ष | ||
२ | डॉ. एस. एम. चव्हाण | सचिव | |||
३ | डॉ श्री.अविनाश आनंदराव ब्राम्हणकर मु.सालेबर्डी पो.दिघोरी ; मु..पो ता.साकोली जिल्हा.- भंडारा. | सदस्य | ५ वर्ष | ||
४ | श्री. विजय महादेव खोब्रागडे , मु.पो.- शिवनी ता.- लाखनी. जिल्हा.- भंडारा | सदस्य | ५ वर्ष | ||
५ | श्री. हरेंद्र बालचंद रहांगडाले मु.पो.- चिचोली ता.- तुमसर. जिल्हा.- भंडार | सदस्य | ५ वर्ष | ||
६ | सौ. जोत्सना अनिल घोरमारे मु.पो.- कुंभली ता.- साकोली. जिल्हा.- भंडारा. | सदस्य | ५ वर्ष | ||
७ | श्री. गोपिचंद पांडुरंग भेंडारकर मु.तई ;बु.द्धपो.- हरदोली ता.- लाखांदुर. जिल्हा.- भंडारा. | सदस्य | ५ वर्ष | ||
८ | सौ. विजया सुदाम शहारे मु.पो.- पोहरा ता.लाखनी. जिल्हा - भंडारा | सदस्य | ५ वर्ष | ||
९ | सौ. मंजुषा आशिष पातरे मु.पो.- मोहाडी ता.- मोहाडी जिल्हा - भंडारा. | सदस्य | ५ वर्ष | ||
१० | सौ रुपलता नामदेव जांभुळकरमु.- गराडा. पो.- केसलवाडा;वाघद्ध ता.- लाखनी.ता.जिल्हा.- भंडारा. | सदस्य | ५ वर्ष |
जिल्हा वार्षिक योजना : बिगर आदिवासी सर्वसाधारण योजना
भंडारा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामापर्फत सन २०१३-१४ मध्ये राबविण्यात आलेल्या योजना खालीलप्रमाणे आहेत. सदर योजनांची नावे , योजनेचे स्वरुप , लाभार्थी निवडीचे निकष दर्शविणारे विवरणपऋा
योजनेचे नाव -- कामधेनू दत्तक ग्राम योजना :
योजनेचे स्वरुप --
सन २०१३-१४ या वर्षात कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविणे प्रस्तावित केले असून सदर योजनेतून गावाची निवड करणेकरीता खालील निकष आहेत.
- गावाची निवड करतांना सदरचे गाव दुध संकलन केंद्राच्या मार्गावरील असावे.
- निवड केलेल्या गावात पैदाक्षम गायी व म्हशीची संखया किमान ३०० असावी. तथापी पशुवैद्यकीय संस्थांच्या कार्यक्षेत्रातील ज्या गावांमध्ये दुधाळ जनावरांची संखया सर्वात जास्त असेल त्या गावाचे प्राधान्याने निवड करावी.
- सरपंच, ग्रामसेवक तसेच दुध संस्थाचे पदाधिकारी यांचा सक्रीय सहभाग मिळत असलेल्या गावांना प्राधान्य द्यावे.
- सदरच्या योजनेतील गावांची निवड जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे अध्यक्षतेखाली सनिंयऋाण समितीमापर्फत करण्यात यावी.
अ क्र | बाब | मर्यादा |
१ | पशुपालक मंडळ स्थापन करणे व सहलीचे आयोजन करणे | ७००० |
२ | जंतनाशक शिबीर | १७५०० |
३ | खनिजद्रव्य मिश्रण व जिवनसत्व पुरवठा | ४०००० |
४ | गोचीड गोमाश्या निर्मुलन शिबीर | १३००० |
५ | वंधत्व निदान व औषद्यौपचार शिबी | २२००० |
६ | वैरण विकास कार्यक्रम | १७००० |
७ | निकत्रष्ठ चारा सकस करणे | ५००० |
८ | प्रसिध्दी व प्रचार | २१००० |
९ | नाविण्यापुर्ण उपक्रम राबविणे | ५००० |
१० | जनावरांचे मलमूत्र व वाया गेलेल्या कचर्याचे खत व्यवस्थापन करणे ;प्रशिक्षण व प्रात्यक्षिकेद्ध | ५००० |
ऐकून | १५२५०० |
सदर योजना भंडारा जि.प. अंतर्गत कार्यरत असलेल्या एकूण ५३ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यक्षेत्रातील ५३ गावांमध्ये राबविण्यात आले.
योजनेचे नाव -- एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत ५० टक्के अनुदानावर एक
दिवसीय सुधारीत कक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे
योजनेचे स्वरफप :
लाभार्थींना एक दिवसीय सुधारीत कक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे १०० कुक्कुट पक्षांच्या गटाची किमंत १६,००० रुपये असून लाभार्थींना, रु ८,००० शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. त्यातुन एक दिवसीय १०० पिल्ले व खाद्य; आवश्यक खाद्याच्या ५० टक्के व उर्वरीत ५० टक्के लाभार्थी हिस्सा रु. ८,००० लाभार्थीने स्वतः उभाऋण त्यातून एक दिवसीय १०० पिल्लांच्या गटासाटी लागणारा निवारा, वाहतुकीवरील खर्च, उर्वरीत खाद्यावरील खर्च, औषधी, पाण्याची भांडी, खांद्याची भांडी इ. वरील खर्च लाभार्थींनी करावयाचा आहे.
लाभार्थी निवडीचे निकष - लाभार्थींची निवड खालील प्राधान्य क्रमानुसार करण्यात येईल.
प्राधान्यक्रम उतरत्या क्रमाने -
१ दारीद्रय रेषेखालील लाभार्थी २ भुमिहीन शेतमजूर ३ मागासवर्गीय ४ अल्प व अत्यल्प भुधारक
सन २०१३-१४ , लाभार्थींना एक दिवसीय सुधारीत कक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप
करणे ४८१ योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
३) योजनेचे नाव -- संकरीत कालवडी व सुधारीत म्हशींच्या पारडयांची जोपासना करण्यासाठी विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम अंतर्गत पशुखाद्य पुरवठा करणे ;५० टक्के अनुदानावर
योजनेचे स्वरुप - लाभार्थीकडील संकरीत , देशी कालवडी पारडयांची शासनश्रोत पध्दतीने जोपासना करण्याठी,तिच्या वयाच्या ४ थ्या महिण्यापासून ३२ महिण्यापर्यंत व सुधारीत, देशी पारडीला वयाच्या ४ थ्या महिण्यापासून वयाच्या ४० महिण्यापर्यंत पशुखाद्याच्या स्वरुपात ५० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरविण्यात येते.
एका कूटुंबातील एका कालवड + पारडीसाठी योजनेत लाभ देण्यात येईल. व पशुखाद्य विम्रूाासाठी एका कालवडीकरीता अनुदानाची मर्यादा रु १०,००० व एका पारडीसाठी अनुदान मर्यादा रु. १२५०० राहील.
लाभार्थी निवडीचे निकष : लाभार्थी अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक, भुमिहीन शेतमजूर, पशुपालक असावा.
लाभार्थी प्राधान्य :१) विकंलांग लाभार्थी ०३ टक्के, २) महिला लाभार्थी ३० टक्के
विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम अंतर्गत संकरीत + देशी कालवडी व सुधारीत देशी म्हशींच्या पारडयांची जोपासना करण्याठी खाद्य पुरवठा करणे योजने अंतर्गत १९७ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे.
४) योजनेचे नाव - वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम - शेतक-यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप ;१०० टक्के अनुदानावर
योजनेचे स्वरूप - लाभार्थीकडील जनावरांच्या दुग्ध उत्पादन क्षमतेत वाढ करण्याकरीता ,
पशुधनाची उत्पादकता वाढविण्याकरीता पशुधनाला पुरेशी हिरवी वैरण उपलब्ध होण्यासाठी शेतक-याचे शेतावर वैरणीचे उत्पादन घेण्याकरीता १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे पुरवठा करण्यात येईल. प्रती लाभार्थी एक एकरच्या क्षेत्रात वैरण उत्पादन घेण्यासाठी १०० टक्के अनुदानावर
रफ. ६०० च्या मर्यादेत वैरण बियाणे + ठोंबे पुरवठा करण्यात येईल.
लाभार्थी निवडीचे निकष -
१) लाभार्थीकडे वैरण उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीन व सिंचनाची सुविधा असावी. २) लाभार्थीकडे ३ ते ४ जनावरे असावीत.
लाभार्थी प्राधान्य
१) विकंलांग लाभार्थी ०३ टक्के , २) महिला लाभार्थी ३० टक्के
वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम - शेतक-यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप ;१०० टक्के अनुदानावर योजने अंतर्गत १२२५ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे.
विशेष घटक योजना : अनुसुचित जाती उपयोजना
अनुसुचित जाती + नवबौध्द लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप योजना
१) योजनेचे नाव -- अनुसुचित जाती उपयोजना ; विशेष घटक योजना अंतर्गत
अनुसुचित जाती + नवबौध्द लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप
योजनेचे स्वरूप - अनुसुचित जाती + नवबौध्द लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर एका लाभार्थीस २ दुधाळ जनावरे वाटप २ संकरीत गाई+म्हशीच्या एका गटाची किंमत ८५,०६१+- रुपये असून अनुसुचित जातीच्या लाभार्थिंना ७५ टक्के रुपये ६३७९६+- शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
लाभार्थी निवडीचे निकष - अनु. जाती + नवबौध्द लाभार्थींची निवड खालील प्राधान्य
क्रमानुसार करण्यात येईल. प्राधान्यक्रम उतरत्या क्रमाने -
- दारिद्या रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर पर्यंतचे भुधारक
- अल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भुधारक
- सुशिक्षित बेरोजगार ; रोजगार व स्वंयरोजगार केद्रांत नोंद असलेले
- महिला बचत गटातील लाभार्थी ; अ.क्र. १ ते ४ मधील
लाभार्थी प्राधान्य
१) विकंलांग लाभार्थी ०३ टक्के २) महिला लाभार्थी ३० टक्के
अनुसुचित जाती उपयोजना ; विशेष घटक योजना अंतर्गत अनुसुचित जाती + नवबौध्द लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप योजने अंतर्गत १६४ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे.
२) योजनेचे नांव - अनुसुचित जाती+ नवबौध्द लाभार्थींच्या दुभत्या जनावरांना १०० टक्के अनुदानावर खाद्य वाटप योजना
योजनेचे स्वरूप - लागोपाठच्या दोन वेतामध्ये भाकड कालावधीसाठी प्रत्येक म्हशीसाठी २२५ किलो व प्रत्येक गायीसाठी १५० किलो पच्चुखाद्य पुरवठा १०० टक्के अनुदानावर करण्यात येईल.
गाभन काळात शेवटच्या २ महिण्यासाठी ; प्रगत गाभन काळासाठी द्ध प्रत्येक गायी / म्हशींना अतिरीक्त ९० किलो खाद्य १०० टक्के अनुदानावर देण्यात यावे. पशुखाद्य वाहतुकीचा खर्च लाभार्थींनी करावयाचा आहे.
लाभार्थी निवडीचे निकष - अनु. जाती + नवबौध्द लाभार्थींची निवड खालील प्राधान्य
क्रमानुसार करण्यात येईल. प्राधान्यक्रम उतरत्या क्रमाने -
- अत्यल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर पर्यंतचे भुधारक
- अल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भुधारक
- भुमिहीन शेतमजूर
- पशुपालक असावा.
लाभार्थी प्राधान्य
१) विकंलांग लाभार्थी ०३ टक्के २) महिला लाभार्थी ३० टक्के
अनुसुचित जाती उपयोजना ; विशेष घटक योजना द्ध अंतर्गत अनुसुचित जाती + नवबौध्द लाभार्थींच्या २०६ जनावरांना १०० टक्के अनुदानावर खाद्य वाटप योजने अंतर्गत लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे.
आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपयोजना
योजनेचे नांव - अनुसुचित जमातीच्या लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर शेळी गट वाटप योजना ; १० शेळया व १ बोकड.
योजनेचे स्वरफप - अनुसुचित जमातीच्या लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर एका लाभार्थीस १० शेळया व १ बोकड वाटप
सदर योजनेत १० शेळया व १ बोकड यांप्रमाणे एका गटाची किंमत ४७,८४८+- रुपये असून
अनुसुचित जातीच्या लाभार्थिंना ७५ टक्के रुपये ३५८८६+- शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
लाभार्थी निवडीचे निकष - अनु. जमाती लाभार्थींची निवड खालील प्राधान्य
क्रमानुसार करण्यात येईल. प्राधान्यक्रम उतरत्या क्रमाने -
- दारीद्रय रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर पर्यंतचे भुधारक
- अल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भुधारक
- सुशिक्षित बेरोजगार ; रोजगार व स्वंयरोजगार केद्रांत नोंद असलेले
- महिला बचत गटातील लाभार्थी ; अ.क्र. १ ते ४ मधील
लाभार्थी प्राधान्य १) विकंलांग लाभार्थी ०३ टक्के २) महिला लाभार्थी ३० टक्के
योजनेचे नांव - आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपयोजना ; ओ टि एस पी अंतर्गत
अनुसुचित जमातीच्या लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप
योजनेचे स्वरफप - अनुसुचित जमाती लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर एका लाभार्थीस २ दुधाळ जनावरे वाटप २ संकरीत गाई+म्हशीच्या एका गटाची किंमत ८५,०६१+- रुपये असून अनुसुचित जातीच्या लाभार्थिंना ७५ टक्के रुपये ६३७९६+- शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
लाभार्थी निवडीचे निकष - अनु. जाती + नवबौध्द लाभार्थींची निवड खालील प्राधान्य
क्रमानुसार करण्यात येईल. प्राधान्यक्रम उतरत्या क्रमाने -
- दारीद्रय रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर पर्यंतचे भुधारक
- अल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भुधारक
- सुशिक्षित बेरोजगार ; रोजगार व स्वंयरोजगार केद्रांत नोंद असलेले
- महिला बचत गटातील लाभार्थी ; अ.क्र. १ ते ४ मधील
लाभार्थी प्राधान्य
१) विकंलांग लाभार्थी ०३ टक्के २) महिला लाभार्थी ३० टक्के
आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपयोजना अंतर्गत अनुसुचित जमातीच्या लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप योजने अंतर्गत ७ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे.
पुशसंवर्धन विभागाची कार्यपध्दती
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प.भंडारा
पंचायत समिती तालुका प्रमुख | तालुक्यातील पशुवैदयकिय दवाखाने श्रेणी-१ | तालुक्यातील पशुवैदयकिय दवाखाने श्रेणी-२ |
पशुधन विकास अधिकारी (विस्तार) | पशुधन विकास अधिकारी (प्रमुख) | सहा.पशुधन विकास अधिकारी (प्रमुख) |
पुशधन पर्यवेक्षक (मतदनीस) | व्रणेपचारक (मतदनीस) | परिचर (मतदनीस) |
परिचर मदतनीस) |
क्रमांक | योजनेचे नांव व लेखाशिर्ष |
१ | पशुवैदयकीय दवाखना/पशुप्रथमोपचार केंद्गसाठी इमारत बांधणे २४०३-८३४८ |
२ | पशुवैदयकीय संस्थांना औषध पुरवठा करणे तसेच शेळया मेंढयांना जंतनाशक औषध पुरविणे २४०३८३५७ |
३ | कामधेनू दत्तक ग्राम योजना २४०३ ०५४ |
४ | एकात्मिक कुक्कुट विकास योजना- (एक दिवसाी सुधारीत पक्षाचे गटाचे वाटप) २४०३-८४३७ |
५ | संकरीत कालवधी व सुधारीत जातीच्या म्हशीच्या पारडया जोपासन्यासाठी विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम ३४०३-८४०१ |
६ | शेतक-यांच्य शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप २४०३-८४०१ |
७ | पशुसंवर्धनासाठी प्रदर्शन व प्रसार कार्यक्रम |
८ | जि.प.ना योजनातंर्गत अनुदान, जि.प.संअ कार्यालयाचे बळकटीकरण करणे २४०३ ९६४ |
विशेष घटक योजना- अनुसूचित जाती उपयोजना २०१३-१४ (मार्च २०१४) | |
१ | अनुसुचित जाती/नवबौध्द लाभार्थीना दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे (७५ टक्के अनुदानावर) २४०३-२०५४ |
२ | अनुसूचीत जाती/नवबौध्द लाभार्थीच्या दुधाळ जनावरांना ,खादय वाटप करणे (१०० टक्के अनुदानावर ) २४०३-२०५४ |
३ | अनुसुचित जाती लाभार्थीकडील शेळश्या,मेएया व कोंबडयांना जंतनाशक,क्षार मिश्रण २४०३ बी २६३ |
आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना २०१३-१४ (मार्च-२०१४) | |
१ | अनुसुचित जमातीच्या लाभार्थीना दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे ( ७५ टक्के अनुदानावर) |
२ | अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना शेळी गट वाटपक करणे (७५ टक्के अनुदानावर ) २०४०३१४८८ |
३ | पशुवैदयकीय संस्थांना औषध पुरवठा करणे २४०३१४२३ |
केंद्ग पुरस्कृत योजना (केंद्ग/राज्य) २०१३-१४ (मार्च-२०१४) | |
१ | लाळया खुरकत रोगाचे नियंत्रण व रोगमुक्त पट्टा निर्माण करणे एफ एम डी स्ी पी २४०३-२४१२ |
२ | अॅस्कॅड अंतर्गत आर्थिीक दुृष्टया महत्वाचे रोगावर नियंत्रण |
३ | आर्थिक दृष्अया महत्वाचे रोगावंर नियंत्रण (एचएस बी क्यु आर डी एससीपी) (केंद्ग पुरस्कृत विशेष घटक) |
४ | राष्ट्रीय ब्रुसोलोसीस नियंत्रण कार्यक्रम (२४० बी ९६२) १०० टक्के |
जिल्हा निधी योजना २०१२-१३ (मार्च -२०१४) | |
१ | विषारी साप,पिसाळलेली कुत्री,चावलेल्या जनावरांना लस टोचणी |
२ | जनावरांना खोडे पुरविणे |
३ | प्रचार व प्रसिध्दी |
४ | पशुवैदयकीय दवाखाना बांधकाम व दुरुस्ती |
५ | इतर खर्च नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत पावलेल्या जनावरांचे मालकांना पुरक अर्थसहाय्यक |
इतर योजना
(1) केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत लाळ खुरकत रोगाचे नियंत्रण
उद्देश :-
लाळखुरकत रोगापासुन जनावरांना मुक्त करुन लाळ खुरकत रोगमुक्त नियंत्रण पट्टा तयार करणे.
लाभार्थी निकष :- ज्या लाभार्थी कडे गोवंशीय व महीष वंशीय जनावरे आहे असे सर्व लाभार्थी.
लाभाचे स्वरुप :- एक रुपया सेवा शुल्क आकारणी करुन 100 टक्के अनुदानावर लाळखुरकत रोग प्रतिबंधक मोफत लसिकरण.
अर्ज करण्याची पध्दतः- पंचायत समिती स्तरावर कार्यरत नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांच्या संख्येची नोंदणी करावी. तसेच पंचायत समिती स्तरावर पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेकडे नोंदणी करावी किंवा साधा अर्ज करावा.
(2) संकरीत कालवडी आणि सुधारीत म्हशीच्या पारडयांची जोपासना करण्यासाठी विशेष पशुधन विकास कार्यक्रम
उद्देश :- संकरीत कालवडीच्या तिच्या वयाच्या 4 ते 32 महिण्यापर्यंत व म्हशीच्या पारडीची तिच्या वयाच्या 4 ते 40 महिण्यापर्यंत अनुदानावर पशुखाद्य पुरवठा करुन उत्कृष्ठ संगोपण करणे व सुदृढ कालवड निर्माण करणे.
लाभार्थी निकष :- अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक किंवा शेतमजुर लाभार्थीकडे कृत्रिम रेतनाव्दारे निर्मीत किंवा खरेदी केलेल्या जनावरांसोबत असलेल्या 4 महिण्याच्या संकरीत कालवडी किंवा सुधारीत जातीच्या म्हशीची पारडी असावी. 50 टक्के लाभार्थी हिस्सा नगदी वा वित्तीय संस्थेचे कर्ज उपलब्ध करुन घेणारा लाभार्थी असावा.
लाभाचे स्वरुप :-
(अ) अल्प भूधारक - 2.5 एकरापेक्षा जास्त परंतु 5 एकरापेक्षा कमी कोरडवाहु जमीन, बागायत जमीन असल्यास 2.5 एकरापेक्षा जास्त व 1.25 एकर पर्यंत असावी. अशा लाभार्थीस पशुखाद्य किंमतीचे 50 टक्के अनुदान देण्यात येईल.
(ब) अत्यल्प भूधारक - 2.5 एकरापेक्षा जास्त कोरडवाहु जमीन नसावी, बागाईत जमीन असल्यास 1.25 एकर पर्यंतच असावी. अशा लाभार्थीस पशुखाद्य किंमतीचे 50 टक्के अनुदान देण्यात येईल.
(क) शेतमजुर - शेतजमीन नसलेला लाभधारक, परंतु त्याचे 50 टक्के पेक्षा जास्त उत्पन्न शेताच्या मजुरीतून मिळालेले असावे. अशा लाभार्थीस पशुखाद्य किंमतीचे 66.66 टक्के अनुदान देण्यात येईल.
अर्ज करण्याची पध्दत :- सदर योजना प्रायोगीक तत्तावर पंचायत समिती नागभीड, ब्रम्हपुरी, अंतर्गत राबविण्यात येत असल्याने संबंधित पंचायत समिती स्तरावर पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेकडे योजनेचा लाभ घेण्यासाठी साधा अर्ज करावा.
- अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीः-
- कृत्रिम रेतनाव्दारे संकरीत कालवड किंवा सुधारीत म्हशीची पारडी निर्माण झाली असल्यास संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यातुन घेतलेले प्रमाणपत्र.
- कालवड किंवा पारडी बाजारातून खरेदी केली असल्यास तिच्या वयासंबंधात पशुवैद्यकीय अधिकार्यााचे प्रमाणपत्र.
- अपत्याचा दाखला.
- अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, शेतमजुर असल्याबाबतचे ग्राम पंचायत चे प्रमाणपत्र. शौचालयाचा वापर करीत असल्याबाबतचा ग्राम पंचायतीचा दाखला.
(3) पशुवैद्यकीय संस्थांना औषधांचा पुरवठा
जनावरांना होणारे विविध आजार व अतितातडीचे आजाराकरीता सदर योजनेअंतर्गत औषधीचा पुरवठा पशुवैद्यकीय संस्थांना प्राप्त तरतुदीचे अधिन राहून करण्यात येतो. एक रुपया सेवाशुल्क आकारुन सर्व पशुपालकांना त्यांचे जनावरांवर उपरोक्त आजारासाठी मोफत औषधोपचार केल्या जातो. यासाठी नजिकच्या पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना यांचेशी संपर्क साधावा.
(4) दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा -
उद्देश :- विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसुचीत जाती व नवबौध्द लाभार्थींना 75 टक्के अनुदानावर 2 संकरीत गायी किंवा 2 सुधारीत जातीच्या म्हशीचे गट वाटप करुन लाभार्थीचे आर्थीक उत्पन्नात भर घालणे व दुग्धव्यवसाय निर्माण करणे.
लाभार्थी निकष :- अनुसुचीत जाती किंवा नवबौध्द लाभार्थी असणे आवश्यक आहे. शक्यतो दारिद्र्य रेषेखालील लाभधारकाची प्राधान्याने निवड करण्यात येते. पुरेशे बि.पी.एल. लाभार्थी उपलब्ध न झाल्यास कमी उत्पन्न गटातील लाभार्थ्यांची निवड केल्या जाते. एका गावातील 5 पेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड केल्या जाते.
लाभाचे स्वरुप :- विशेष घटक योजने अंर्गत अनुसुचीत जातीच्या व नवबौध्द लाभधारकांना 75 टक्के अनुदानावर 2 संकरीत गायी किंवा 2 संधारीत जातीच्या म्हशी चे वाटप करण्यात येते. 25 टक्के लाभार्थी हिस्सा लाभार्थ्यांनी स्वतः भरणे किंवा वित्तीय संस्था वा बँक कर्ज स्वरुपात मिळवुन घ्यावी लागते. 2 संकरीत गायी किंवा 2 सुधारीत म्हशीच्या गटाची एकुण किंमत रुपये 85061/- लाभार्थीस मिळणारे लाभाचे स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2 संकरीत गाईचा गट / 2 सुधारीत जातीच्या म्हशीचा गट
1. शासकीय अनुदान 75 टक्के रुपये 63796/-
2. लाभार्थी हिस्सा 25 टक्के रुपये 21265/-
उपरोक्त लाभ दुधाळ जनावरे खरेदी स्वरुपात आहे.
अर्ज करण्याची पध्दत :- विहीत नमुन्यात अर्ज संबंधित पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) किंवा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागाकडे सादर करावा.
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी- 1) जातीचा दाखला 2) दारिद्र रेषेखालचा दाखला / उत्पन्नाचा दाखला 3) रहिवासी दाखला 4) अपत्याचा दाखला 5) रु. 100/- च्या स्टॅम्प पेपरवर करारनामा 6) शौचालय वापर करीत असल्याचा दाखला 7) इतर पुरक दाखले व अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो.
(5) आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थी कडील दुभत्या जनावरांना खाद्य पुरवठा करणे
उद्देश :- आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थीकडील दुभत्या जनावरांना त्यांचे भाकळ काळाकरीता पशुखाद्यांचा पुरवठा करुन गर्भपोषण करणे व जनावर शारीरीकदृष्टया सक्षम करणे तसेच दुग्धोत्पादनात वाढ करणे.
लाभार्थी निकष :- लाभार्थी हा आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी असावा. तसेच लाभार्थीकडे शासकिय योजनेत मिळालेले दुधाळ जनावरे अथवा लाभार्थीकडील स्वतःचे दुधाळ जनावरे (गाई व म्हैस) असलेला आदिवासी लाभार्थी.
लाभाचे स्वरुप :- आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थी कडील दुधाळ जनावरांकरीता भाकळ काळासाठी गाईला 150 किलो व म्हशीला 225 किलो पशुखाद्याचा पुरवठा करावयाचा असून प्रगत गाभण व्यवस्थेतील गाई किंवा म्हशीचे गर्भपोषणाकरीता 90 किलो अतिरीक्त पशुखादयाचा पुरवठा करावयाचा आहे.
अर्ज करण्याची पध्दत :- विहीत नमुन्यात अर्ज संबंधित पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) किंवा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागाकडे सादर करावा.
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी- 1) जातीचा दाखला 2) रहिवासी दाखला 3) अपत्याचा दाखला 4) शौचालय वापर करीत असल्याचा दाखला 5) अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो
(6) विशेष घटक योजना- अनु.जाती / नवबौध्द लाभार्थी कडील दुभत्या जनावरांना खाद्य पुरवठा करणे
उद्देश :- अनु.जाती/ नवबौध्द लाभार्थीकडील दुभत्या जनावरांना त्यांचे भाकळ काळाकरीता पशुखाद्याचा पुरवठा करुन गर्भपोषण करणे व जनावर शारीरीकदृष्टया सक्षम करणे तसेच दुग्धोत्पादनात वाढ करणे.
लाभार्थी निकष :- लाभार्थी हा अनु.जाती किंवा नवबौध्द असावा. तसेच लाभार्थीकडे शासकीय योजनेत मिळालेले दुधाळ जनावरे अथवा लाभार्थीकडील स्वतःचे दुधाळ जनावरे (गाई व म्हैस ) असलेला अनु.जाती किंवा नवबौध्द लाभार्थी.
लाभाचे स्वरुप :- अनु.जाती/नवबौध्द लाभार्थीकडील दुधाळ जनावरांकरीता भाकळ काळासाठी गाईला 150 किलो व म्हशीला 225 किलो पशुखाद्याचा पुरवठा करावयाचा असून प्रगत गाभण व्यवस्थेतील गाई किंवा म्हशीचे गर्भपोषणाकरीता 90 किलो अतिरीक्त पशुखाद्याचा पुरवठा करावयाचा आहे.
अर्ज करण्याची पध्दत :- विहीत नमुन्यात अर्ज संबंधित पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) किंवा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागाकडे सादर करावा.
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी :- 1) जातीचा दाखला 2) रहिवासी दाखला 3) अपत्याचा दाखला 4) शौचालय वापर करीत असल्याचा दाखला 5) अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो.
(7) जिल्हा वार्षिक योजना- बिगर आदिवासी योजनेत 50 टक्के अनुदानावर एक दिवसीय 100 पिल्लांचा गट पुरवठा योजना
उद्देश :- बिगर आदिवासी योजनेअंतर्गत कोणत्याही गटातील लाभार्थींना 50 टक्के अनुदानावर एक दिवसीय 100 पिल्लांचे गट वाटप करुन लाभार्थीचे आर्थिक उत्पन्नात भर घालणे व कुक्कुट व्यवसाय निर्माण करणे.
लाभार्थी निकष :- सदर योजनेचा लाभ कोणत्या गटातील लाभार्थी घेऊ शकतो. परंतु दारिद्र रेषेखालील लाभार्थी , भुमीहीन शेतमजुर, मागावर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थीस प्राधान्य राहील.
लाभाचे स्वरुप :- एक दिवसीय 100 पिल्लांच्या गटाची एकुण किंमत रुपये 16,000/- त्यापैकी 50 टक्के अनुदानातुन रुपये 8000/-चे मर्यादेत प्रतिलाभार्थी एक दिवसीय 100 पिल्ले (किंमत रुपये 2000/-) आणि खाद्य (रुपये 6000/- किंमतीच्या मर्यादेत) पुरवठा करण्यात येते. उर्वरीत 50 टक्के रक्कम म्हणजेच रुपये 8000/- लाभार्थीने स्वतः उभारुन त्यातून एकदिवसीय 100 पिल्लांच्या गटासाठी लागणारा निवारा, वाहतुकीवरील खर्च, उर्वरीत खाद्यावरील खर्च, औषधी, पाण्याची भांडी इ. वरील खर्च करावयाचा आहे.
अर्ज करण्याची पध्दत :- विहीत नमुन्यात अर्ज संबंधित पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) किंवा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज सादर करावा.
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी :- 1) जातीचा दाखला 2) रहिवासी दाखला 3) अपत्याचा दाखला 4) शौचालय वापर करीत असल्याचा दाखला 5) अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो
(8) जिल्हा वार्षिक योजना बिगर आदिवासी योजने अंतर्गत तालुका स्तरीय पशुप्रदर्शनीचे आयोजन
प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट जनावरे येत असल्यामुळे व उत्कृष्ट जनावरांना बक्षीस प्राप्त होत असल्यामुळे शेतक-या मध्ये उत्कृष्ट जनावरे निर्मितीबाबत स्पर्धा होत असल्याने सुधारीत पशुपैदास निर्मीतीस वाव मिळते व प्रदर्शनी मध्ये तज्ञाकडुन अत्याधुनिक उपचार पध्दती, व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन प्राप्त होत असल्यामुळे शेतक-यांच्या ज्ञानात भर पडते. यास्तव तालुका स्तरीय पशुप्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भाग घ्यावा. यासाठी पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेशी सपंर्क साधावा.
(9) कृत्रिम रेतन कार्यक्रम -
कृत्रिम रेतनाव्दारे संकरीकरणामुळे अधिक दुध देणा-या गायी / म्हशीच्या पैदासाकरीता जिल्हयात प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात कृत्रिम रेतनाची सोय उपलब्ध आहे. संकरीत गायी, म्हशीपासुन भरपूर प्रमाणात दुध उत्पादनांत वाढ अपेक्षित आहे. यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात प्रत्येक गायी / म्हशीकरीता एक रुपया नोंदणी शुल्क व रुपये 20/- प्रति कृत्रिम रेतनाकरीता सेवाशुल्क आकारल्या जाते. जर ही सेवा घरपोच दयावयाची असल्यास रुपये 20/- सेवाशुल्क भरावे लागेल. तरी जास्तीत जास्त प्रमाणात देशी गायी / म्हशींना कृत्रिम रेतनाव्दारे फळवुन संकरीकरणाचा लाभ घ्यावा.
जिल्हा परिषद सेस फंड योजना :-
(1) 50 टक्के अनुदानावर सुधारीत जातीचे वैरण बियाणे वाटप -
जनावरांना चांगल्या प्रतिचे हिरवे वैरण उपलब्धतेसाठी खरीप व रब्बी हंगामात एम.पी.चारी, मका, व मालदांडी व बरसीम बियाणे उपलब्ध तरतुदीच्या अधिन राहुन 50 टक्के अनुदानावर वाटप करण्यांत येते. या योजनेचा लाभ सर्व जाती / जमातीच्या लाभार्थींना घेता येईल. यासाठी नजिकच्या पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेशी संपर्क साधावा.
(2) पिसाळलेले कुत्रे जनावरांना चावल्यास उपचार
पिसाळलेले कुत्रे जनावरांना चावल्यास पशुवैद्यकीय संस्थेचे अधिकारी तथा पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचे मार्गदर्शनाखाली कुत्रा चावलेल्या जनावरांना अॅंन्टीरेबीज लस पशुवैद्यका मार्फत टोचुन घ्यावी. यासाठी नजिकच्या पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेशी संपर्क साधावा.
(3) भूकंप, पूर, विज, आग, वादळ व सर्पदंश तसेच ईलेक्ट्रीक वायर तुटल्याने किंवा ईलेक्ट्रीक शॉक अशा घटनामध्ये मृत पावलेल्या जनावरांचे मालकाला मुल्यांकनाप्रमाणे जास्तीत जास्त रुपये 7500/- चे मर्यादेत अनुदान देणे (बैल व दुधाळ गाई,म्हशी )
भूकंप, पूर, विज, आग, वादळ व सर्पदंश तसेच ईलेक्ट्रीक वायर तुटल्याने किंवा इलेक्ट्रीक शॉक अश्या घटनामध्ये बैलाचा किंवा दुधाळ गाई, म्हशीचा मृत्यु ओढावल्यास शेतक-यांचे अतिशय नुकसान होते. ऐन शेतीच्या हंगामामध्ये बैलाचा मृत्यु झाल्यास शेतक-यांचा हंगाम बुडतो व दुधाळ गाई, म्हशीचा मृत्यु झाल्यास शेतक-याची आर्थिक परिस्थिती कमकुवत होते. अशा परिस्थितीत शेतक-यास त्वरीत मदत उपलब्ध करुन देण्याच्या उदेशाने जिल्हा परिषद सेस योजनेतून अनुदान तत्वावर योजना राबविण्यात येत आहे.
लाभार्थी निकष :- भूकंप, पूर, विज, आग, वादळ व सर्पदंश तसेच इलेक्ट्रीक वायर तुटल्याने किंवा इलेक्ट्रीक शॉक अशा घटनामध्ये शेती कामाच्या बैलाचा मृत्यू झाल्यास किंवा दुधाळ गाई, म्हशीचा मृत्यू झालेला संबंधित शेतकरी.
लाभाचे स्वरुपः- भूकंप, पूर, विज, आग, वादळ व सर्पदंश तसेच ईलेक्ट्रीक वायर तुटल्याने किंवा ईलेक्ट्रीक शॉक अश्या घटनामध्ये शेती कामाच्या बैलाचा मृत्यू झाल्यास किंवा दुधाळ गायी, म्हशीचा मृत्यू झाल्यास संबंधीत शेतकर्या स बैलाच्या/ दुधाळ गायी, म्हशीच्या मुल्यांकनानुसार जास्तीत जास्त रुपये 7500/- पर्यंत अनुदान मंजुर करुन बैल / दुधाळ गायी, किंवा म्हैस खरेदी करुन देण्यात येईल. रुपये 7500/- पेक्षा अधिक किंमतीचा बैल / दुधाळ जनावर असल्यास अधिकची रक्कम लाभधारकास स्वतः भरावी लागेल व उपरोक्त योजनेतुन खरेदी केलेल्या बैलाचा / दुधाळ जनावराचा विमा उतरविणे आवश्यक व बंधनकारक राहील. यासाठी संबंधित पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेशी संपर्क साधावा.
अर्ज करण्याची पध्दत :- विहीत नमुन्यात लाभार्थीने आवश्यक कागदपत्रासह अर्ज संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेकडे सादर करावा.
अर्जासोबत खालील कागदपत्रे सोबत जोडावी :- 1) पटवारी किंवा सक्षम अधिका-या कडुन प्राप्त मृत्यूबाबत पंचनामा रिपोर्ट 2) पशुधन विकास अधिका-या चे बैलाचे / दुधाळ जनावराचे शव विच्छेदन अहवाल (सर्पंदंश मध्ये अत्यावश्यक )
(4) सर्रा, पिन्नस, लिव्हर फल्युक रोगाचे नियंत्रण
सर्रा, पिन्नस, लिव्हर फल्युक रोगाचे नियंत्रणासाठी आजारी जनावरांचे उपचारार्थ प्राप्त तरतुदीचे अधिन राहुन औषधी पुरवठा पशुवैद्यकीय दवाखान्यांना करण्यात येतो. यासाठी नजिकच्या पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेशी संपर्क साधावा.
(5) जनावरांसाठी कृमी नाशक औषधी खरेदी
जनावरांचे कृमी विकारापासुन बचाव होण्याचे दृष्टिने प्राप्त तरतुदीचे अधिन राहून औषधी पुरवठा पशुवैद्यकीय दवाखान्यांना करण्यात येतो. यासाठी नजिकच्या पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेशी संपर्क साधावा.
(6) रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी पेटंट औषधी खरेदी
रोग प्रादुर्भाव सारख्या परिस्थितीत जनावरांना वेळीच उपचार मिळणेस्तव प्राप्त तरतुदीचे अधिन राहून औषधी पुरवठा पशुवैद्यकीय दवाखान्यांना करण्यात येतो. यासाठी नजिकच्या पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेशी संपर्क साधावा.
(7) नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांच्या उपचारासाठी औषधी खरेदी
नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांना वेळीच औषधोपचार मिळणेस्तव प्राप्त तरतुदीचे अधिन राहून औषधी पुरवठा पशुवैद्यकीय दवाखान्यांना करण्यात येतो. यासाठी नजिकच्या पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेशी संपर्क साधावा.
(8) वंधत्व जनावरांचे तपासणी शिबीरे
गायी, म्हशी मधील वंधत्व दूर करुन जनावर प्रजोत्पादनासाठी सुदृढ होण्याचे दृष्टिने प्राप्त तरतुदीचे अधिन राहून औषधी पुरवठा पशुवैद्यकीय दवाखान्यांना करण्यात येतो. यामध्ये शिबीरामध्ये वंधत्व जनावरांची तपासणी शिबीर आयोजीत करुन वंधत्वग्रस्त जनावरांवर उपचार करण्यात येते. यासाठी नजिकच्या पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेशी संपर्क साधावा.
(9) प्रभाग निहाय पशुचिकित्या शिबीराचे आयोजन
प्रभाग निहाय पशुचिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात येते या शिबीरामध्ये वंधत्व तपासणी, गर्भधारणा तपासणी, लहान मोठया शस्त्रक्रिया व असाध्य रोगावर उपचार हा तज्ञ चमुकडून करण्यात येतो व जनावरांचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन प्राप्त होत असल्यामुळे शेतक-यांच्या ज्ञानात भर पडते. यास्तव प्रभाग निहाय पशुचिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात येते. या शिबीरामध्ये जास्तीत जास्त शेतक-यांनी भाग घ्यावा. यासाठी पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती तसेच संबंधित संस्थाप्रमुखाशी सपंर्क साधावा.