WELCOME TO Official Website of zilha parishad Bhandara.
Read More

रावणवाडी

रावणवाडी हे स्थळ भंडारा तालुक्यात मुखयालयासुन २० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणी सुमारे १०० वर्षापासुन मौजा रावणवाडी येथील पहाडीवर रामाचे मंदीराचे बांधकाम श्री सिताराम दुबे रा. गुंधारा यांनी केले आहे. सध्या या मंदीराची देखरेख गावकरी करीत आहेत. श्री राम मंदीरावर दखिणेस हनुमान मंदीर आहे. पश्चिमेस अंबामाईचे मंदीर आहे. तसेच पायथ्याशी रावणवाडी जलाशय असून त्यात नेहमी पाणी असते. कार्तिक महिन्यात एकादशी अमावस्शेला येथे यात्रा भरते. तलावाच्या दोन्ही बाजूस पहाडी व घनदाट जंगल आहे त्यामुळे प्रेक्षणीय स्थळ निर्माण झालेले आहे
Read More

चांदपूर

चांदपूर हे स्थळ तुमसर तालुक्यात भंडारा मुखयालयापासुन 70 कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणी उंच पर्वतरांगा असून सर्व परिसर घनदाट वनराईने वेढलेले आहे. दोन पहाडाच्यामध्ये उंच पाळ टाकण एक मोठे जलाशय निर्माण करण्यात आलेले आहे हे जलाशन उर्वरीत बाजूंनी घनदाट वत्रक्षाछादीत पहाडांनी वेढलेले आहे.ं या जलाशयांच्या पाळीवर उभे राहून बघीतल्यास विहंगम निसर्गसौदर्य दत्रष्टीपथास पडते. या जलाशयापासून एक कि.मी. अंतरावरील पहाडावर पफार पुरातन काळापासुन हनुमानाचे व महादेवाचे मंदीर आहे. येथिल गावकृयांनी या मंदीराचा जिनौव्दार केलेला असून या ठिकाणी सर्व सोईयुक्त मोठे मंदीर निर्माण केलेले आहे चैऋा मासात या ठिकाणी एक महिन्याकरिता मोठी यात्रा भरते व मोठया संखयेने भाविकाची व पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. या मंदिराच्या पुर्वेस जलाशयातुन निघालेला नहर आहे
Read More

कोरंभी देवी

मौजा कोरंभी हे गाव भंडारा शहरापासुन 4 कि.मी. अंतरावर दक्षिण भागात येते. कोरंभी गावाच्या उत्तरेस वैनगंगा नदीच्या तिरावर पहाडी असुन पहाडीवर अंबादेवीचे मंदीर आहे.टेकडीवर चढण्याकरीता पायृया असुन मंदीर सपाटीपासुन 500 फुट उंचावर आहे. टेकडीच्या पुर्व भागात वैनगंगा नदी वाहत असते. नदीला 12 महिने पाणी उपलब्ध असते.कोरंभी देवीला नवराऋामध्ये;दुसरी यात्रा भरते. त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेला व मकरसंक्रातिला सुध्दा यात्रा भरत असते पर्यटना करीता हे स्थळ फारच उपयुक्त आहे.
Read More

गायमुख

गायमुख हे स्थळ तुमसर तालुक्यात असुन भंडारा मुखयालयापासुन 55 कि.मी अंतरावर आहे या ठिकाणी पर्वतरांगा असून सर्व वत्रक्षांनी वेढलेले आहे.या पर्वत रांगेतील एका पहाडातुन बाराही महिने पाण्याची धार वाहते.या ठिकाणी पफार पुरातन काळापासुन महादेवाचे प्रसिध्द मंदीर असुन दर महाशिवरात्रीला महादेवाची भव्य यात्रा भरते. तसेच या ठिकाणी बाराही महिने यात्रेकरू येत असतात. जिल्हयातील सर्वात प्रसिध्द यात्रा स्थळांपैकी हे एक स्थळ आहे स्थानीक लोक या स्थळाला छोटा महादेव म्हणतात.
Read More

सिंधपुरी बुद्ध विहार

सिंधापुरी हे भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ते वैनगंगा या नदीच्या तीरावर वसलेलं आहे. भंडार्या जिल्ह्या पासून ते फक्त ३ किमी एव्हढ्या अंतरावर आहे. तसेच या ठिकाणी बाराही महिने यात्रेकरू येत असतात. जिल्हयातील सर्वात प्रसिध्द यात्रा स्थळांपैकी हे एक स्थळ आहे स्थानीक लोक या स्थळाला महासमाधी बोधी असे ही म्हणतात.

दुर्गाबाईचा डोह कुंभली

दुर्गाबाईचा डोह हे स्थळ साकोलीपासुन ३ किंमी. अंतरावर कुंभली+ धर्मापुरी या गावाजवळ आहे.या गावाजवळ चुलबन नदी वाहते.या नदीवर गावापासुन १ कि.मी. अंतरावर दुर्गाबाईचा डोह आहे. तिळसंक्रातीला या डोहावरती दरवर्षी फार मोठी यात्रा भरते यात्रेनिमित्त या ठिकाणी घोडयांचा बाजार भरत असतो.

नांदोरा झिरी

नांदोरा हया गावाजवळ भंडारा मुखयालयापासुन सुमारे १३ कि.मी. अंतरावर पश्चिमेला झिरी हे पर्यटन स्थळ आहे. झिरी हे स्थळ पहाडीवर समुारे ३०० पफुट उंचीवर आहे. पहाडीवरफन नेहमी पाण्याचा क्षारा वाहत असतो. पहाडीवर महादेवाचे मंदीर आहे. पहाडी वरील क्षााडे, मंदीर व नेहमी वाहत असलेला पाण्याचा क्षारा यामुळे हे ठिकाण रमणिय व प्रेक्षणिय स्थळ बनले आहे. नांदोरा;क्षिारीद्ध या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला व मकरसंक्रातीला फार मोठी यात्रा भरते.

भत्रशुंड मंदीर

सदर स्थळ भंडारा येथे मंदीर मुखयालयापासुन २ कि.मी. अंतरावर आहे. स्थळावर श्री चे असुन मुर्तीची कथा फार पुरातन आहे. मुर्ती अंदाजे ७५० वर्षा पुर्वीची प्रतिष्ठापित आहे. सदर स्थळावर दर चतुर्थीला मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात . त्यामुळे या स्थळाला पफार मोठी प्रसिध्दी लाभलेली आहे

चप्राड पहाडी

हे स्थळ लाखांदुर तालुक्यात असुन जवळील पहाडीवर दुर्गामातेचे मंदीर आहे येथे दरवर्षी नवरात्रात उत्सव होतो व बाराही महिने यात्रेकरू येतात

सोनी संगम

हे स्थळ लाखांदुर तालुक्यात असुन सोनीपासुन १ कि.मी अंतरावर वैनगंगा व चुलबन नदी एकत्र मिळतात त्यामुळे या ठिकाणी सुंदर देखावा निर्माण झालेला आहे. येथे तिळसंक्रातीला श्रध्दाळू दर्शनाला व आंघोळीसाठी येतात त्यावेळी येथे मोठी यात्रा भरते.

उत्तर वाहिनी ;मांढळ

हे स्थळ लाखांदुर तालुक्यापासुन १२ कि.मी अंतरावर आहे. मांढळ गावापासुन वाहणारी चुलबन नदी आपल्या प्रवाहाची दिशा बदलवून दक्षिणेकडून उत्तरकडे वाहत जाते. त्यामुळे स्थळ भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे तिळसंकांतीला येथे भव्य यात्रा भरते -