विभागाची उदिष्टये
शालेय शिक्षण व क्रिडा क्षेञामध्ये खालील उदिष्टांची पूर्तता करण्यास जिल्हा परिषद कटिबध्द आहे.
- प्राथमिक शिक्षणांचा उर्जा उंचावून त्यामध्ये जिवनोपयोगी शिक्षणाचा समावेश करणे.
- सर्व मुला मूलींचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे.
- शाळांतील विद्याथ्यांच्या गळती कमी करुन १०० टक्के उपस्थितीचे उदिष्ट साध्य करणे.
- ६ ते १४ वयोगटातील शाळा सोडलेली /शाळेत कधीच न गेलेली , स्थलांतरीत मुलांकरिता पर्यायी शिक्षणाचे उपक्रम राबविणे
- विशेष गरजा असलेल्या मुलांना शिक्षणाची समान संधी व सहभाग मिळवून देणे.
- मूलीच्या प्राथमिक शिक्षणासाठी विशेष कार्यक्रम राबविणे.
शैक्षणिक विकांसाठी असलेल्या जिल्हा परिषदेच्या , राज्याच्या व केद्गांच्या पूढील योजना राज्यात प्रभावीपणे राबविणे.
जिल्हा परिषद योजना
सेवा पुरविणारे अधिकारी : जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी ,शिक्षणाधिकारी(प्राथमिक) | |
अ.क्र | योजनेचे नांव |
२ | योजनेचे नांव-राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना इयत्ता १ ते १२ पर्यंत शाळेत शिकत असलेल्या विदयार्थ्यांचा अपघात होऊन मृत्यु झाल्यास किंवा अपघातामुळे अपंगत्व आल्यास त्या विदयार्थ्यांच्या पालकांना आर्थिक सहाय्य म्हणुन लाभ दिला जातो याकरीता जिल्हास्तरावर मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.शाळा मार्फत प्रस्ताव इयत्ता १ ते ८ चे शिक्षण विभाग (प्राथमिक)व इयत्ता ९ ते १० चे शिक्षण विभाग (माध्यमिक) ला प्राप्त झाल्यानंतर सदर प्रस्तावाची तपासणी करुन मा.जिल्हाधिकारी यांचे समिती पुढे ठेवले जातात.शासन निर्णय क्र.पिआरई/२०११/पत्रक्र.२४९/प्राशि-१/दिनांक-१ आक्टोंबर २०१३ नुसार कार्यवाही केली जाते. उददेश -१) इयत्ता १ ते १२ पर्यंत शिकणा-या मुलामुलींना मृत्यु अथवा अपघातामुळे अपंगत्व आल्यास त्यांच्या पालकास लाभ देणे. लाभाचे स्वरुप :-शासन निर्णय क्र.पिआरई/२०११/पत्रक्र.२४९/प्राशि-१/दिनांक-१ आक्टोंबर २०१३ नुसार १)विदयार्थ्यांचा अपघाती मृत्यु झाल्यास रु.७५,०००/- २)अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव/२ डोळे किंवा १ अवयव व १ डोळा )निकामी रु.५०,०००/- ३)अपघातामुळे कायमचे अपंगत्व (एक अवयव किंवा १ डोळा )कायम निकामी रु.३०,०००/- |
३ | योजनेचे नांव सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये जिल्हा परीषद शाळेत शिकत असलेल्या निराधार ,आर्थिक दृष्टया दुर्बल व सामाजिक दृष्टया मागासलेल्या ,अपंग मुली शिक्षणापासुन वंचित राहु नये म्हणुन त्यांना शिक्षणात हातभार लावण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. शासन परीपत्रक क्र.स्त्रीशियो/१०९३/(९३८)प्रा.शि.२/दिनांक-३ एप्रिल १९९३ नुसार सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना निधीचे आर्थिक व्यवहार व इतर कामे पाहण्यासाठी मा.सभापती शिक्षण समिती जिल्हा परीषद,भंडारा यांचे अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. स्वरुप -१)शाळेत शिकत असलेल्या निराधार आर्थिक दृष्टया गरीब असलेल्या मुली शिक्षणापासुन वंचित राहु नये म्हणुन आर्थिक मदत दिली जाते. २)समाजातील दानशुर व्यक्तीकडुन निधी गोळा करुन मुदती ठेवी रक्कम बँकेत ठेवली जाते व त्यातुन मिळणा-या व्याजावर मुलींना लाभ दिला जातो. ३)गरजु मुलींचे प्रस्ताव शाळा मुख्याध्यापका कडुन मागीतली जातात व समिती दवारे उपलब्ध निधीचा विचार करुन लाभार्थी विदयार्थीनीची निवड केली जाते व प्रतिमाह रु.५०/- प्रमाणे एकुण वर्षाचे रु.५००/- मुख्याध्यापका मार्फत विदयार्थीना लाभ दिला जातो. |
४ | योजनेचे नांव स्काऊट गाईड व कबबुलबुल इयत्ता १ ते ४ करीता कबबुलबुल व इयत्ता ५ ते १० करीता स्काऊट गाईड चा अभ्यास क्रमात समावेश केलेला आहे.भारत स्काऊट गाईड विभागा मार्फत जिल्हा ,राज्य ,राष्ट्रीय स्तरावर मेळावे घेतले जातात.उददेश -१)विदयार्थ्यामध्ये स्वावलंबन वाढीस लावणे .२)विदयार्थ्यामध्ये वैयक्तिक,सामाजिक,राष्ट्रीय मुल्य रुजविण्याकरीता विविध उपक्रमाची उपाययोजना करणे. |
५ | गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करणे - माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी इ.१२ वी )परिक्षेत ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेवून उत्तिर्ण झालेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो .जिल्हा निधी -३ शिक्षण ,या योजने अतंर्गत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याकरिता ५०,०००/- (पन्नास हजार )रुपये ची तरतुद करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र व मोमेंटो (शिल्ड ) देवून कार्यक्रम घेण्यात येतो. |
६ | ग्रामीण भागात क्रीडासत्राचे आयोजन करणे - (अ) जिल्हास्तर (ब) तालुकास्तर (क)केंद्गस्तर जिल्हा परिषद भंडारा ,जिल्हा निधी -३ शिक्षण या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचा शारीरिक ,बौध्दीक व सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने खेळाचे कौशल्ये विकसित करण्यासाठी शाळांस्तरावर कबड्डी ,खो-खो ,व वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात येते. जिल्हा निधी ३- शिक्षण ,अंतर्गत जिल्हा स्तरावरील क्रीडासत्राचे आयोजन करण्यासाठी १,५०,०००/-रु. ची तरतुद करण्यात आली आहे. व तालुकास्तरावरील क्रीडासत्राचे आयोजन करण्यासाठी ७०,०००/- रु.ची तरतुद करण्यात आली असून ७ तालुक्यांना प्रत्येकी १०,०००/-रु प्रमाणे तरतुद वाटप करण्यात येते .तसेच केंद्गस्तरावरील क्रीडासत्रा करिता ३,००,०००/-रु.ची तरतुद करण्यात आली असून ६० केंद्गाना प्रत्येकी ५,०००/- रु. प्रमाणे तरतुद करण्यात येते. |
७ | अल्पसंख्यांक समाजातील शालेय विद्याथ्यार्ं-ाा मोफत गणवेष वाटप योज-ााः- शासन निर्णय क्र.असंस-२००९ प्र.क्र./कार्या-१,दि.२४ फेब्रुवारी २००९ या योजनेअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळा वगळता राज्यातील इतर सर्व शासनमान्य प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ४ थी मध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्यांक समाजातील विदयार्थी-विदयार्थींनींना मोफत गणवेष उपलब्ध करुन देण्यात येतात.या योजनेची अंमलवजावणी राज्यस्तरावर शिक्षण संचालक,अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,यांच्यामार्फत करण्यात येत असून त्याकरिता त्यांना ऑगस्ट ते मार्च अखेरपर्यंत शासनाकडून अनुदान इपलब्ध करुन दिले जाते.जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी(प्राथमिक) यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यात येवून शाळा स्तरावर लाभार्थी विदयार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येते. |
८ | अल्पसंख्यांक समाजातील शालेय विद्याथ्यार्ंच्या उपस्थितीकरिता पालकांना प्रोत्साहन भत्ताः- शासन निर्णय क्र.असंस-२००९ प्र.क्र.३७/कार्या-१,दि.५ फेब्रुवारी २००९ नुसार या योजने अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळा वगळता राज्यातील इतर सर्व शासनमान्य प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकत असलेल्या व एकूण शैक्षणिक दिवसांच्या किमान ७५ टक्के शालेय उपस्थिती असलेल्या अल्पसंख्यांक समाजातील विदयार्थी-विदयार्थींनींच्या उपस्थितीकरिता पालकांना प्रति दिवस रु.२/- या प्रमाणे २२० दिवस ग्राहय धरुन प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो.या योजनेची अंमलवजावणी राज्यस्तरावर शिक्षण संचालक,अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,यांच्यामार्फत करण्यात येत असून त्याकरिता त्यांना दरवर्षी सप्टेंबर,डिसेंबर व मार्च या तीन टप्प्यात शासनाकडून अनुदान उपलब्ध करुन दिले जाते.जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी(प्राथमिक) यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यात येवून शाळा स्तरावर लाभार्थी विदयार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येते. |
९ | मुलींच्या पटनोंदणीसाठी प्राथमिक शिक्षकांना प्रोत्साहनपर पारितोषिकः- शासन निर्णय क्र.७०८४,दि.१३ जून १९८४ नुसार प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरण करण्यासाठी मुलींची पटनोंदणी वाढविण्याच्या दृष्टीकोनातून इयत्ता १ ली मध्ये १०० टक्के मुलींची पटनोंदणी करण्यासाठी प्राथमिक स्तरावर शिक्षण विस्तार अधिकारी व जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक यांना प्रोत्साहनपर म्हणून रु.१००/- रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येते. |
१० | मदरसामधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्ग शासन पुरस्कृत योजना :- शासन निर्णय क्र.मदर-२००८ प्र.क्र.३४८/०८,दि.१० आक्टोबर २००९ न्वये मदरसांमधून धार्मिक शिक्षण् घेणा-या विदयार्थ्यांना आधुनिक विषय शिकविण्यासाठी केंद्ग शासन पुरस्कृत क्षेत्रीय सधन कार्यक्रमांतर्गत मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे |
११ | डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना :- शासन निर्णय क्र.अविवि-२०१० प्र.क्र.१५२/कार्या-६,दि.११ आक्टोबर २०१३ नुसार या योजने अंतर्गत मदरसांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विदयार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारीक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान ,गणित ,समाजशास्त्र,हिंदी,मराठी व इंग्रजी व उदुर् या विषयाचे शिक्षणदेणे ,मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणा-या इ.९ वी,इ.१० वी ,११ वी व १२ वी तील तसेच औदयोगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे,परिणामी विदयार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होवून त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल यादृष्टीने मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा,ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्यात येते. |
१२ | सर्वागिण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत माझी मुल माझी शाळा १) विद्यार्थ्याला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त करुन देणे. २) शालेय परिसराचा गुणात्मक विकास करणे ३) शाळेची गुणवत्ता वाढविणे ४) शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध घटकांना प्ररित करणे ५) विद्यार्थी, शिक्षक यांचा सर्वागिण विकास करणे. तरतूद : ७००००० संभाव्य कार्यवाही :या कार्यक्रमाची अंमलबजावणीची मुख्य जबाबदारी केंद्ग प्रमुखाची राहील. प्रकल्पा अंतर्गत सर्व पर्यवेक्षिय यंत्रणा यांचे प्रशिक्षण व सर्व शिक्षकांना प्रशिक्षण केंद्ग संमेलनातून देण्यात येईल. या प्रकल्पाचा विकास आढावा शाळा स्तरावर नियमितपणे केंद्गप्रमुख घेतील व तसा अहवाल जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रश्क्षिण संस्था भंडारा येथे सादर करतील. तालुका निवड समितीद्वारे शाळाची तपासणी करुन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवड करतील तसेच जिल्हा निवड समितीद्वारे तालुक्यातून आलेले प्रथम, द्वितीय व तृतीय शाळाची तपासणी करुन जिल्हयातून निवड करण्यांत येईल. तालुका व जिल्हयातून निवड झालेल्या शाळांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यांत येईल. |
१३ | राष्ट्रीय / राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार १) शिक्षकांच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करणे.२) शिक्षकांना कार्य करण्याकरिता प्रोत्साहन देणे. संभाव्य कार्यवाही: १) माहे फेब्रुवारी व मार्च पर्यत प्राथमिक व माध्यमिक स्काऊट गाईड व थोरसमाज सुधारक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षकाकरिता पंचायत समिती निहाय ज्या मुख्याध्यापक व शिक्षकांची सेवा २० व १५ वर्ष झाली असेल अशा शिक्षकांचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांच्या शिफारसीने मागविण्यांत येतात. २) ज्यांच्यावर फौजदारी खटला व विभागीय चौकशी प्रलंबीत नाही अशा शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हा निवड समिती प्राथमिक विभागातून ४, माध्यमिक विभागातून ४, स्काऊट गाईड १ व सावित्रीबाई फुले १ असे प्रस्ताव राज्य निवड समितीकडे दिनांक ३१.५.१४ पर्यत सादर करणे. ३) राज्य निवड समिती निवड करुन दिनांक ५ सप्टेंबर शिक्षकदिनी मा.मुख्यमंत्री, म.रा. यांचेहस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन सहपत्नीक सत्कार करण्यांत येतो. |
१४ | जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार १) शिक्षकांच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करणे.२) शिक्षकांना कार्य करण्याकरिता प्रोत्साहन देणे. १) जिल्हा आदर्श पुरस्कार जिल्हा पातळीवरील पुरस्कार असून त्याची पूर्णपणे अंमलबजावणी जिल्हा परिषद पातळीवरुन केली जाते. २) ज्या मुख्याध्यापक व शिक्षकांची सेवा १५ वर्ष पुर्ण झाली असेल अशा शिक्षकांचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी, खंडविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती यांच्या शिफारसीने दिनांक ९ ऑगष्ट पर्यत प्रस्ताव मागविण्यात येतात. ३) आदर्श शिक्षकांना जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा पुरस्कार देण्यासाठी जिल्हा निवड समितीद्वारे प्रत्येक तालुक्यातून एक प्राथमिक व एक माध्यमिक तसेच जिल्हा स्तरावर एका विशेष शिक्षकांची निवड करण्यांत येते. ४) निवड करतांना संबंधीत शिक्षका विरुध्द गुन्हा दाखल आहे किंवा नाही तसेच फौजदारी खटल्यात गुंतला आहे किंवा नाही यांची गटशिक्षणाधिकारी, खंडविकास अधिकारी, सभापती यांनी शिफारस केलेल्या प्रस्तावाची छाननी करुन आदर्श शिक्षकांची निवड जिल्हा समितीद्वारे केल्या जाते. ५) निवड झालेल्या शिक्षकांचा ५ सप्टेंबर शिक्षक दिनी रोख ५००/-, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सहपत्नीक सत्कार करण्यात येतो. |
सेवाजेष्ठता यादी
शिक्षण विभागा अतर्गत ११ संवर्ग येत असून ते खालील प्रमाणे आहेत.
- केंद्ग प्रमुख
- उच्चश्रेणी मुख्याध्यापक
- प्राथमिक शिक्षक
- माध्यमिक मुख्याध्यापक
- उच्चश्रेणी शिक्षक
- निम्नश्रेणी मुख्याध्यापक
- क.म.वि.शिक्षक
- कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
- वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
- प्रयोग शाळा सहाय्यक
- प्रयोग शाळा परिचर
आस्थापणा विषयक माहिती
शिक्षण विभाग (पाथमिक) जिल्हा परिषद भंडारा
अ.क्र. | संवर्ग | मंजूर पदे | भरलेली पदे | रिक्त पदे | शेरा |
१ | केंद्ग प्रमुख | ६० | २१ | ३९ | |
२ | उच्चश्रेणी मुख्याध्यापक | १४२ | ६४ | ७८ | |
३ | प्राथमिक शिक्षक | २६९२ | २४३४ | २५८ | |
४ | माध्यमिक मुख्याध्यापक | ३० | ५ | २५ | |
५ | उच्चश्रेणी शिक्षक | २३१ | १४७ | ८४ | |
६ | ािम्मश्रेणी मुख्याध्यापक | १६० | १२४ | ३६ | |
७ | क.म.वि.शिक्षक | १०१ | ५१ | ५० | |
८ | कािष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी | १९ | १० | ९ | |
९ | वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी | १३ | १० | ३ | |
१० | प्रयोग शाळा सहाय्यक | १३ | ९ | ४ | |
११ | प्रयोग शाळा परिचर | ३२ | २३ | ९ |
कार्यरत अधिका-यांची नावे व पदनाम
शिक्षण विभाग (प्राथ) अंतर्गत वर्ग अ व ब ची कार्यरत अधिका-यांची नावे व पदनाम
अ.क्र. | अधिका-याचे नाव | पदनाम |
१ | श्रीमती वर्षा बेले | शिक्षणाधिकारी (प्राथ.) |
२ | रिक्त | उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) |
३ | रिक्त | उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) |
४ | रिक्त | उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) |
५ | रिक्त | मुख्याध्यापक लालबहाद्दूर विद्यालय, भंडारा |
६ | रिक्त | मुख्याध्यापक जकातदार विद्यालय, भंडारा |
७ | श्री महेंद्र भगवंत लांडे | अधिक्षक गट ब, सारासेध्द शि. वि. प्राथ. द्ध. जिल्हा परिषद भंडारा पं.सं.भंडारा |
८ | रिक्त | लेखाधिकारी, शापोआद्ध शिक्षण विभाग प्राथ. जिल्हापरिषद भंडारा |
९ | रिक्त | गटशिक्षणाधिकारी पं.सं.भंडारा |
१० | रिक्त | गटशिक्षणाधिकारी पं.सं.भंडारा, जिल्हा परिषद मोहाडी |
११ | रिक्त | गटशिक्षणाधिकारी पं.सं.भंडारा, जिल्हा परिषद तुमसर |
१२ | रिक्त | गटशिक्षणाधिकारी पं.सं.भंडारा, जिल्हा परिषद लाखनी |
१३ | रिक्त | गटशिक्षणाधिकारी पं.सं. भंडारा जिल्हा परिषद साकोली |
१४ | श्री. एस. वाय. शर्मा | गटशिक्षणाधिकारी पं.सं. भंडारा जिल्हा परिषद पवनी |
१५ | रिक्त | गटशिक्षणाधिकारी पं.सं. भंडारा जिल्हा परिषद लाखांदूर |
१६ | रिक्त | अधिक्षक गट ब, सारासेद्ध, शापोआद्ध पं. स. भंडारा, जिल्हा परिषद भंडारा |
१७ | कु. मनिषा उदाराम गजभिये | अधिक्षक गट ब, सारासेद्ध, शापोआद्ध पं. स. मोहाडी , जिल्हा परिषद भंडारा |
१८ | रिक्त | अधिक्षक गट ब, सारासेद्ध, शापोआद्ध पं. स. तुमसर, जिल्हा परिषद भंडारा |
१९ | रिक्त | अधिक्षक गट ब, सारासेद्ध, शापोआद्ध पं. स. साकोली , जिल्हा परिषद भंडारा |
२० | रिक्त | अधिक्षक गट ब, सारासेद्ध, शापोआद्ध पं. स. पवनी , जिल्हा परिषद भंडारा |
२० | रिक्त | अधिक्षक गट ब, सारासेद्ध, शापोआद्ध पं. स. लाखांदूर, जिल्हा परिषद भंडारा |
२१ | श्री एस. एल. गाढवे | संख्याखिक सहारुयक, शिक्षण विभाग प्रा.जिल्हा परिषद भंडारा |
सर्व शिक्षा अभियान जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत तालुकस्तरावरील पदांची स्थिती बाबत विवरण
अ.क्र. | पदाचे नाव | मंजुर पदे | कार्यरत पदे | रिक्त पदे |
१ | गटशिक्षणाधिकारी | ७ | ६ | १ |
२ | गटसमन्वयक/शिक्षण विस्तार अधिकारी | ७ | ७ | ० |
३ | कनिष्ठ अभियंता | ७ | ४ | ३ |
४ | रोखपाल तथा वरिष्ठ लेखा लिपीक | ७ | ७ | ० |
५ | डेटा एन्टªी ऑपरेटर/सहायक | ७ | ६ | १ |
६ | MIS समन्वयक | ७ | ६ | १ |
७ | विषयसाधनव्यक्ती | ४२ | ४१ | १ |
८ | Speech Thearapist | १ | ० | १ |
९ | Physiothearapist | १ | १ | ० |
१० | Occupationale Thearapist | १ | ० | १ |
११ | Psychologist | १ | १ | ० |
१२ | CWSN विषयसाधनव्यक्ती | १४ | ८ | ६ |
१३ | फिरते विशेष शिक्षक IED | ६२ | ६१ | १ |
एकुण | १६४ | १४८ | १६ |
सर्व शिक्षा अभियान जि.प.भंडारा अतर्गत राबविण्यात येणा-या योजना
![]() |
शाळाबाहय मुलांचे विशेष प्रशिक्षण बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील प्रकरण २, कलम ३(४) नुसार, सहा वर्षापेक्षा अधिक वयाच्या बालकाने कोणत्याही शाळेत प्रवेश घेतला नसेल किंवा प्रवेश घेतलेला असला तरी, त्याला किंवा तिला आपले प्रारंभिक शिक्षण पूर्ण करता आले नसेल, तेव्हा, त्याला किंवा तिला त्याच्या किंवा तिच्या वयाला योग्य असलेल्या वर्गात प्रवेश देण्यात येईल. अशा समकक्ष वर्गात थेट प्रवेश दिलेल्या बालकास विशेष प्रशिक्षण घेण्याचा हक्क असेल. सर्व शिक्षा अभियान अतंर्गत अशा प्रकारच्या बालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते. विशेष प्रशिक्षण हे ३ महिने, ६ महिने व ९ महिने या कालावधीचे अनिवासी स्वरुपात, बालकांच्या त्या त्या वर्गाच्या पूर्ण क्षमता प्राप्त होईपर्यंत देण्यात येते. सेवा पुरविणारे अधिकारी: जिल्हा पर्यायी शिक्षण समन्वयक |
![]() |
मोफत पाठयपुस्तके शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेणार्या सर्व मुला मुलींना, सर्व शिक्षा अभियान अतंर्गत मोफत पाठयपुस्तके वितरीत करण्यात येतात. सन २०१४-२०१५ या शैक्षणिक सत्राकरिता जिल्हयातील इयत्ता १ ली ते ८ वी चे एकूण १,३४,९६७ पात्र लाभार्थीकरिता ७,८४,४७३ पाठयपुस्तकांची, मागणी पाठयपुस्तक मंडळाकडे नोंदविण्यात आलेली आहे. सदर पाठयपुस्तके , शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे २६ जून रोजी पुस्तके दिनी समारंभापूर्वक वितरीत करण्यात येतील. सेवा पुरविणारे अधिकारी: सहाय्यक कार्यक्रम अधिकारी |
![]() |
शालेय गणवेश योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेणा-या सर्व मुली, अनु. जाती मुले, अनु. जमाती मुले व दारिद्गयरेषेखालील पालकांचे मुले, यांना सर्व शिक्षा अभियान अतंर्गत गणवेशाचे दोन संच शाळा व्यवस्थापन समिती व्दारे वितरीत करण्यात येतात. तसेच राज्य शासनाच्या योजनेतील लाभार्थींना सुध्दा एक गणवेश संच सर्व शिक्षा अभियान अतंर्गत व दुसरा गणवेश संच राज्य शासन योजनेअतंर्गत पुरविण्यात येतात. गणवेश योजनेसाठी प्रति विदयार्थी रु. ४००/- इतकी तरतूद अनुज्ञेय आहे. सत्र २०१४-२०१५ करिता एकूण ६६,०४४ पात्र लाभार्थीकरिता तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. सेवा पुरविणारे अधिकारी : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी |
![]() |
शिक्षक प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ते ८ वी ला शिक्षण देणा-या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येते. सत्र २०१४-२०१५ मध्ये इयत्ता ३ री व ४ थी च्या शिक्षकांकरिता पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण व इ. ५ वी ते ८ वीच्या शिक्षकांकरिता, भाषा, गणित व विज्ञान विषयाचे प्रशिक्षण प्रस्तावित करण्यात आलेले आहे. तसेच अप्रशिक्षित शिक्षकांसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा यांचेमार्फत प्रशिक्षण आयोजित केले जातात. सेवा पुरविणारे अधिकारी :शिक्षण विस्तार अधिकारी |
![]() |
गट साधन केंद्र सर्व शिक्षा अभियानाच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी, पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचे नियंत्रणाखाली गट साधन केंद्गाची निर्मिती करण्यात आलेली आहेत. गट साधन केंद्गावर, सांख्यिकीय माहिती संकलित करण्यासाठी -. व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांनी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच कनिष्ठ अभियंता, लेखा लिपिक, ६ विषयसाधन व्यक्ती, विशेष गरजा असणा-या विदयार्थ्यांसाठी २ विषय साधन व्यक्ती तसेच शाळांतील विशेष गरजा असणा-या विदयार्थ्यांना सेवा देण्यासाठी केंद्गनिहाय विशेष शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. गट साधन केंद्गाचे सक्षमीकरणासाठी स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात आलेले आहे. तसेच दरवर्षी सादिल अनुदान, सभा/प्रवास अनुदान, शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा अनुदान व देखभाल दुरुस्ती अनुदान वितरीत करण्यात येतात. सेवा पुरविणारे अधिकारी:सहाय्यक कार्यक्रम अधिकारी |
![]() |
समूह साधना केंद्र केंद्ग स्तरावर, सर्व शिक्षा अभियान उपक्रम अमंलबजावणीसाठी, केंद्गप्रमुख यांच्या नियंत्रणाखाली समूह साधन केंद्गाची निर्मिती करण्यात आलेली आहे. एकूण ६३ समूह साधन केंद्गापैकी ४३ समूह साधन केंद्गाकरिता स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात आलेले आहे. समूह साधन केंद्गाकरिता सादिल अनुदान, सभा/प्रवास अनुदान, शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा अनुदान व देखभाल दुरुस्ती अनुदान वितरीत करण्यात येतात. सेवा पुरविणारे अधिकारी: सहाय्यक कार्यक्रम अधिकारी |
![]() |
शाळा अनुदान शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांना, शाळा अनुदान वितरीत करण्यात येते. इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतचे वर्ग असलेल्या शाळांना, प्रती शाळा रु. ५०००/- प्रमाणे व इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे वर्ग असलेल्या शाळांना, प्रती शाळा रु. ७०००/- प्रमाणे शाळा अनुदान वितरीत करण्यात येते. सेवा पुरविणारे अधिकारी:सहाय्यक कार्यक्रम अधिकारी |
![]() |
संशोधन व मूल्यमापन शैक्षणिक समस्या व उपाययोजनाचे संशोधन व मूल्यमापन करिता सदर उपक्रमांतून तरतूद उपलब्ध करुन देण्यात येते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत कृतिसंशोधन सुध्दा या उपक्रमांतून करण्यात येतात. सेवा पुरविणारे अधिकारी:संगणक प्रोग्रामर |
![]() |
शाळा देखभाल दुरुस्ती अनुदान शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना इमारत देखभाल दुरुस्ती करिता सदर अनुदान वितरीत करण्यात येते. यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील ३ पर्यंत वर्गखोल्या असलेल्या शाळांना रु. ५०००/- पर्यंत व ३ पेक्षा जास्त वर्गखोल्या असलेल्या शाळांना रु. १००००/- पर्यंत देखभाल दुरुस्ती अनुदान वितरीत करण्यात येते. सेवा पुरविणारे अधिकारी:सहाय्यक कार्यक्रम अधिकारी |
![]() |
समावेशित शिक्षण विशेष गरजा असलेल्या ० ते १८ वयोगटातील बालकांना सामान्य शाळेत सामान्य बालकासोबत शिक्षण घेण्यास खालीलप्रमाणे शैक्षणिक साहाय्यभूत सेवा पुरविण्यात येतात. १.मदतनिस भत्ता -अपंगत्वामुळे स्वतंत्रपणे शाळेत ये-जा करु न शकणा-या विदयार्थ्याना रु.२५०/- प्रतिमहा १० महिन्याकरीता. २.प्रवास भत्ता - २-३ कि.मी.अंतरावरुन शाळेत ये-जा करणा-या विदयार्थ्याना रु.२५०/- प्रतिमहा १० महिन्याकरीता. ३.काळजिवाहक-अतितिव्र अपंग विदयार्थ्यांना गृह आधारे शिक्षण देण्यास १२ महिनेकरीता काळजीवाहकांची नियुक्ती करण्यात येते. ४.साहित्य साधने-अस्थिव्यंग,सेरेब्रल पाल्सी,बहुविकलांग विदयार्थ्यांना-ट्रायसिकल,व्हिलचेअर,कमोड चेअर,माडिफाय चेअर,कॅलिपर्स्, ई.,कर्णबधिर विदयार्थ्यांना-श्रवणयंत्र,तसेच अंध विदयार्थ्यांना-ब्रेल बुक,लार्ज प्रिंन्ट,अंध काठी,भिंग ई. ५.थेरॅपी सेवा- जिल्हयातील थेरॅपीची गरज असलेल्या ६५० विदयार्थ्यांना थेरॅपी कक्ष जे.के.विदयालय भंडारा येथे थेरॅपीस्ट मार्फत थेरॅपी सेवा देण्यात येते. ६.सायकालॉजिस्ट- जिल्हयातील विशेष गरजाधारक मतिमंद विदयार्थ्यांचे आय. क्यु काढणे,त्यांना वैदयकिय प्रमाणपञ मिळवून देणे, विशेष शिक्षक,काळजीवाहक,शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करणे. ७.विशेष शिक्षण - जिल्हयातील विशेष गरजाधारक विदयार्थ्यांना अध्यापन करण्यास प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरावर ६२ विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली असून एकुण ८०७ विदयार्थ्यांना विशेष शिक्षकामार्फत शिक्षण देण्यात येते. शिक्षक,काळजीवाहक,शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करणे. सेवा पुरविणारे अधिकारी:जिल्हा समन्वयक १ |
![]() |
लोकप्रतिनिधी प्रशिक्षण बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील प्रकरण ४, कलम २१ अतंर्गत कायम विनाअनुदानित शाळे व्यतिरिक्त प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये (जेथे इयत्ता १ ते ८ वी पर्यंतचे किंवा त्यापैकी कोणत्याही इयत्तेपर्यंतचे शिक्षण दिले जाते ते केंद्ग), शाळा व्यवस्थापन समिती गठीत करणे आहे. सदर शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना शैक्षणिक योजनांची माहिती व्हावी तसेच शाळेचे समक्षीकरणासाठी, शाळा विकास आराखडा तयार करणे, इ. करिता शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे ३ दिवशीय अनिवासी प्रशिक्षण आयोजित केले जाते. सेवा पुरविणारे अधिकारी:शिक्षण विस्तार अधिकारी |
![]() |
नवोपक्रम नवोपक्रम अतंर्गत मुलींचे शिक्षण, अनु. जाती/जमाती मुलांचे शिक्षण व अल्पसंख्याक मुलांचे शिक्षण याकरिता नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. मुलींचे शिक्षण या उपक्रमातंर्गत मीना राजू मंच, अनु.जाती/जमाती मुलांचे शिक्षण या उपक्रमातून अभ्यासिका केंद्ग इत्यादी उपक्रम राबविले जातात. सेवा पुरविणारे अधिकारी:जिल्हा समन्वयक २ |
![]() |
शाळा इमारत, वर्गखोली बांधकाम सर्व शिक्षा अभियाना अतंर्गत जिल्हयामधील स्थानिक व स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये गरजेनुसार वर्गखोल्यांचे बांधकाम शाळा व्यवस्थापन समितीᅠमार्फत पूर्ण करणे, मोडकळीस आलेल्या व दुरुस्तीपलीकडे गेलेल्या शाळा इमारतीचे जागी नवीन शाळेची इमारत बांधने, नवीन शाळा उघडयाचे ठिकाणी नवीन शाळा इमारतीचे बांधकाम करणे, शाळेचा परिसर आकर्षक आणि आनंददायी बनविण्याच्या दृष्टिने वर्गखोल्यांची षट्कोण, चौकोनी आकारात बांधणी करणे, गरजेनुसार संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे तसेच स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी व विदयुत इ. करणे सन २००१ ते २०१४ पर्यंत ७ गटसाधन केंद्ग, ४३ समुह साधन केंद्ग, ४९ नवीन प्राथमिक शाळा इमारत १०३ मुलींच स्वच्छतागृह ३७ पिण्याच्या पाण्याची सुविधा, १७७ शाळांमध्ये संरक्षण भिंत, २३१ विदयुतीकरण, ७ गटसाधन केंद्ग सक्षमीकरण तसेच मोठी दुरुस्ती ५२ असे एकूण २१७२ कामे करण्यात आलेले आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या सर्व उपक्रमांच्या एकूण मंजूर तरतूदीच्या ३३ टक्के मर्यादेत बांधकामासाठी तरतूद प्रस्तावित करण्यात येते. सेवा पुरविणारे अधिकारी:कार्यकारी अभियंता (सर्व शिक्षा अभियान) |
![]() |
लोकजागृती बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतूदींचे प्रसार प्रचार तसेच राष्ट्रीय सणाच्या दिवशी चित्ररथ इत्यादीकरिता सदर उपक्रमांतून तरतूद केली जाते. सेवा पुरविणारे अधिकारी:जिल्हा समन्वयक ३ |
मोफत शिक्षण
नवोदय परिक्षा :- इयत्ता ५ मधे शिकत असलेले मुले सदर परिक्षेला बसविले जातात.या परिक्षेमधुन निवड झालेल्या विद्यार्थ्योचे शिक्षण केद्गशासना मार्फत चाजविल्या जाणा-या नवोदय विद्यालयातुन इयत्ता १२ वी पर्यत मोफत शिक्षण दिले जाते .
प्राथमिक/माध्यमिक अध्यापक विद्यालयात कार्यरत असणा-या कर्मचा-यांचा मुलांना मोफत शिक्षण योजनाः- सदर योजना ५ ते १२ पर्यत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्योसाठी सदर योजना राबविण्यात येते.
इयत्ता १ ते १० वी पर्यत विद्यार्थ्योना मोफत शिक्षण :- जे पालक महाराष्ट्रात १५ वर्षे रहवाशी अशा पालकांच्या पाल्यांना इयत्ता १ ली ते १० वी पर्यत निशुल्क शिक्षण दिले जाते.शिक्षण घेत असलेले अपत्य हे दिनांक १५.६.१९६८ नंतरचे चौथे अपत्य असुन नये तसेच सदरची सवलत ही उतीर्ण विद्यार्थ्योनाच दिली जाते. तसेच विद्यार्थ्योचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे आणि समाजातील सर्व गरीब व गरजु विद्यार्थाना शिक्षण घेता यावे या करीता शासनाने सदर योजना मोफत निशुल्क राबविलेली आहे.
इयत्ता १२ वी पर्यत मुलींना मोफत शिक्षण :- सदर योजना गरीब व गरजु विद्यार्थ्योना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी तसेच समाजातील सर्व मुली शिक्षणापासुन वंचित राहुनये यासाठी शासनाने ही योजना राबविलेली आहे.सदर योजनेत जे पालक महाराष्ट्रात १५ वर्षे रहवाशी अशा पालकांच्या पाल्यानाच ही योजना देय आहे. सदर विद्यार्थ्यीनीवर आकारली जाणारी शिक्षण फी ही शासनाकडुन शाळा/महाविद्यालय यांना अदा केली जाते.
१५००० च्या आत उत्पन्न असणा-या पालकांच्या मुलांना मोफत शिक्षण योजना :- इयत्ता ११ ते १२ पर्यत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्योसाठी सदर योजना राबविण्यात येते.ज्या विद्यार्थ्योचे पालकाचे उत्पन्न १५००० च्या आत आहे.त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.
प्राथमिक/माध्यमिक अध्यापक विद्यालयात कार्यरत असणा-या कर्मचा-यांचा मुलांना मोफत शिक्षण योजनाः- सदर योजना ५ ते १२ पर्यत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्योसाठी सदर योजना राबविण्यात येते.
मागासवर्गीस / अल्पसंख्याक / आर्थिक दृष्टया दुर्बल विद्यार्थ्योनसाठी असलेल्या योजना
राष्ट्रीय आर्थिक दृष्टया दुर्बल घटक योजना ( एन.एम.एम.एस) :- इयत्ता ८ वी मधे शिक्षण घेणा-या व पालकाचे १.५ लाखाचे उत्पन्न असणा-या कोणत्याही संवर्गातील विद्यार्थ्योस ही परिक्षा दिल्यानंतर शिष्यवृत्ती पात्र ठरविले तर ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्योना देण्यात येते.सदर परिक्षेचे ऑनलाईन फार्म मुख्याध्यापका मार्फतीने भरण्यात येते.
आर्थिक दृष्टया मागासवर्गीस विद्यार्थ्योना दयावयाची सवलत :- ज्या विद्यार्थ्योचे पालकांचे उत्पन्न १५००० च्या आत आहे.अश्या वर्ग ५ ते १० मधे शिकणा-या विद्यार्थ्योना या योजनाचा लाभ देता येतो.या योजनेसाठी राज्य शासनाकडुन अनुदान प्राप्त होते.त्याचे वाटप शाळानिहाय जिल्हास्तरावरुन करण्यात येते.
अल्पसंख्याक विद्यार्थ्योना मॅट्रीक पुर्व शिष्यवृत्ती योजना :- सदर समाजातील विद्यार्थ्योना मॅट्रीक पुर्व शिष्यवृत्ती योजना सन २००८-२००९ या वर्षा पासुन शासनाने सुरु केली आहे वर्ग १ ते १० पर्यत शिक्षण घेणा-या अल्पसंख्यंक समाजातील विद्यार्थ्योनासाठी आहे.या शिष्यवृत्ती चे आवेदनपत्रे मुख्याध्यापका मार्फत ऑनलाईन फार्म पाठविलेले जातात सदर योजनेत विद्यार्थ्याचे पालकाचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे तसेच लाभार्थी संख्या मर्यादित असल्याने दारिद्गयरेषे खालील व कमी उत्पन्न असणा-या पालकांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील.एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्योना सदर योजनेचा लाभ देता येत नाही.
इतर शैक्षणिक सवलती/योजना
आय.सी.टी .योजना :- जिल्हयातील माध्यमिक शाळांनमधे संगणक सुविधा आहे.अश्या शाळेतील दोन शिक्षकाचे २१ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येते व आय.सी.टी योजने मार्फत शिक्षकांना प्रशिक्षण देऊन ते विद्यार्थ्योना वर्ग ९ ते १० मधे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्योना संगणकाचा ज्ञान प्राप्त करता येते. इ.१० वी साठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर याद्वारे घेण्यात येणा-या परीक्षेमधे आय.सी.टी हा अनिवार्य म्हणुन ग्रेटचा विषय निवडलेला आहे.यासाठी विद्यार्थ्योची लेखी ४० व प्रात्येक्षिक १० अशी एकुण ५० गुणाची परिक्षा घेण्यात येते.
बालचित्र कला स्पर्धा :- सदर स्पर्धा दरवर्षी १४ ऑगष्ट ला गटशिक्षणाधिरी मार्फत पंचायत समितीस्तरवर इयत्ता १ ते १० चा विद्यार्थ्यान कडुन परिक्षेचे आयोजन केले जाते निवड झालेल्या विद्यार्थ्योना तालुका,जिल्हा व राज्यस्तरावर नेण्याची चालना मिळते.त्यानुसार विद्यार्थ्योना योग्यते बाबत प्रमाणपत्र प्रदान केले जाते.
स्वातंत्र संग्राम सैनिक/माजी सैनिक योजना :- इयत्ता ५ ते १० मधे शिक्षणघेणा-या ज्या विद्यार्थ्योचे पालक स्वातंत्र /माजी सैनिक असतील अशा पालकाच्या पाल्याना सदर योजनेचा लाभ देण्यात येतो.
माध्यमिक शाळेतील मुलींना प्रोत्साहन भत्ता :- इयत्ता ९ वी मधे शिक्षण घेणा-या अनुसुचित जाती व जमाती संर्वगातील विद्यार्थ्याीनीना सदर योजनेतील एकत्रित रक्कम वार्षिक रुपये ३०००/- मा.शिक्षण संचालक पुणे (माध्य व उच्च माध्यमिक) यांचा मार्फत लाभार्थीच्या खात्यात जमा केली जाते.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परिक्षा (एन.टी.एस) :- वर्ग १० चे विद्यार्थी या परिक्षेला बसु शकतात प्रथम जिल्हयास्तरावर व नंतर राष्ट्रीय स्तरावर ही परिक्षा होत असते.राज्यस्तरावर उर्तीर्णे विद्यार्थी संपुर्ण शिक्षण होईपर्यत शिष्यवृत्तीस पात्र ठरतात.
इन्पायरअवार्ड योजना :- इयत्ता ६ ते १० मधे शिक्षण घेतअसलेल्या विद्यार्थ्योनमधे विज्ञान विषयक दृष्टीकोणाला चालना मिळावी यासाठी सदर योजना महत्वाची आहे.यामधे विद्याथ्यास विज्ञान विषयक मॉडेल व प्रयोग तयार करण्यासाठी तसेच प्रदर्शनस्थळी मॉडेल नेण्यासाठी लागणारा खर्च विद्यार्थ्योला रुपये ५०००/- चा धनादेश शासना मार्फत दिला जातो.विद्यार्थ्योनी सदर मॉडेल जिल्हयात,राज्यात व राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी चालना मिळते.
मानव विकास कार्यक्रम
अ) शिकवणी वर्ग :- इयत्ता १० वी व १२ वी मधे अनुर्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्योना विशेष शिकवणी वर्गातील सोय करुन देण्यात आलेली आहे.या मधे इ.१० वी साठी गणित,इग्रजी व विज्ञान तर इ.१२ वी साठी गणित,भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,जिवशास्त्र,इंग्रजी व लेखाकर्म हे विषय शिकवणी वर्गासाठी घेण्यात येतात.त्यासाठी विद्यार्थी संख्या कमीत कती १५ असणे आवश्यक आहे.
ब) अभ्यासिका केंद्र :- मोठया गावातील माध्यमिक शाळेतील मुला मुलींना रात्रीच्या वेळी शाळेत अभ्यास करता यावे या साठी माध्यमिक शाळेत अभ्यासकेंद्रातील स्थापना करण्यात येते.या अभ्यास केंद्रासाठी शोलार लाईट मोफत पुरविल्या जातात तसेच बदलेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके विद्यार्थ्योना अभ्यासिका केंद्रात उपलब्ध करुन दिली जातात.अभ्यास केंद्रावर व्यवस्थापक म्हणुन मुख्याध्यापक किंवा सहाय्यक शिक्षक यांची नेमणुक केली जाते.त्यांचे मानधन शासना मार्फत अदा करण्यात येते.
क) बालभवन विज्ञान केंद्र :- सदर योजना तालुक्याच्या मुख्य ठिकाणी बालभवन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे.विद्यार्थ्योना विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्यासाठी ही योजना कार्यवित आहे.बालभवनामधे विविध वैज्ञानिक मॉडेल,प्रयोग कलासाहीत्य व इतर साहीत्य ठेवले जातात.सदर बालभवन केंद्राला इ ५ ते ८ चे विद्यार्थी प्रत्यक्ष भेट देतात.भेट देणा-या विद्यार्थ्योला प्रती विद्यार्थी १० रुपये प्रोत्साहन भत्ता शासना मार्फत दिला जाते.
ड) मोफत सायकल वाटप योजना :- इयत्ता ८ ते १२ मधे शिक्षण घेत असलेल्या मुलींना शाळेपासुन शुन्यते ५ किलामिटरावर राहणा-या विद्यार्थीनीना मोफत सायकल वाटप करण्याची योजना आहे.सदर मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी शासनामार्फत ३०००/- रुपये लाभार्थीच्या खात्यात जमा केले जातात . माध्यमिक शाळेतील मुलींना शाळेपर्यत येजा करणे सोईचे व्हावे यासाठी ही योजना राबविले जाते.तसेच त्या विद्यार्थ्यीनीने इतर योजनेतुन सायकलचा लाभ घेतलेला नसावा.
ई ) मोफत बस वाहतुक योजना (मुलीनसाठी) :- इयत्ता ८ ते १२ मधे शिकणा-या मुलींना घरापासुन शाळेत मोफत प्रवास करता यावा.या करीता प्रत्येक तालुक्यात ५ बसेस विद्यार्थीनीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
जिजाऊ माता मोफत सायकल वाटप योजना
जिजाऊ माता मोफत सायकल वाटप योजना :- ग्रामीण भागातील शाळांनमधे मुलीचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे या दृष्टीने जिल्हयातील माध्यमिक शाळेत शिक्षण घेणा-या दारिद्गय रेषे खालील फक्त ८ व ९ वी मधे शिक्षण घेणा-या व इयत्ता ७ वी मधे कमीत कमी ४५ टक्के गुण प्राप्त करणा-या तसेच सदर विद्यार्थीनीना ही दारिद्र्य रेषेतील कुटुंब असणे आवश्यक आहे.लाभ मिळणा-या मुलीचे घराचे अंतर शाळेपासुन कमीत कमी दोन किलोमिटर असणे असवश्यक आहे.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान विमा योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान विमा योजनाः- विद्यार्थ्योना अपघाता /मुत्यु झालेल्या आर्थिक नुकसान निधी देण्याच्या दृष्टीने तसेच त्यानंतर सुरक्षा कवच देण्याकरीता राज्यातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यीनीना सदर योजना कार्यान्वीत केलेली आहे.शासकीय विभागाच्या अधिपत्या खालील सर्व मान्यता प्राप्त शाळा /महाविद्यालय यांना सदर योजना लागु असुन.या साठी प्रत्यक्ष पालक किंवा विद्यार्थ्योला कोणताही विमा भरावालागत नाही.
नागरिकांची सनद
नागरीकाची सनद शिक्षण विभाग ;माध्यमिकद्ध जिल्हा परिषद भंडारा येथील दर्शविणारे विवरण पऋाक
कर्यासन क्र. | सेवेचा तपशिल | सेवापुरविणारे अधिकारी कर्मचारी यांचे नाव | सेवा पुरविण्याचे विहीत मुदत | सेवामुदतीत न पुरविल्यास तक्रार करणा-या अधिका-याचे नाव व हुद्या |
१ | मानव विकास आयोगाचे सर्व प्रकारची कामे सांभाळणे | श्रीमती एम एम देशमुख उप शिक्षणाधिकारी | ------------ | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
२ | राष्ट!ीय माध्यमिक सवै शिक्षा अभियान यांचे सर्व प्रकारचे काम सांभाळणे | श्रीमती एम एम देशमुख उप शिक्षणाधिकारी | ------------ | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
२ | राष्ट!ीय माध्यमिक सवै शिक्षा अभियान यांचे सर्व प्रकारचे काम सांभाळणे | श्रीमती एम एम देशमुख उप शिक्षणाधिकारी | ------------ | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
३ | माहितीचा अधिकाराची कामे व सहारूयक माहिती अधिकारी यांची कामे सांभाळणे,आमदार,खासदार,जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य,पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यांना पऋााची उत्तरे पाठविणे | श्री.पी.डी.जनबंधुअधि वर्ग २ व३ जि.प.नियंऋाण | ------------ | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
४ | जिल्हयातील खाजगी उच्च माध्य+क.म.वि शाळेतील वर्ष निहाय अनुदान निर्धारण करणे,नविन तुकडी,शाळा मान्यता,शाळा स्थांनातरण वगैरे कामे करणे | श्री.एस.के.डोये शिक्षण विस्तार अधिकारी | ७ दिवस | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
५ | वेतन निश्चिती,सेवा निवत्रत्ती,वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक,खाजगी,शायकीय शाळा यांचे अंदाज पऋाके,शिक्षण संचालक,शिक्षण उपसंचालक यांचाकडे सादर करणे | श्री.पी.डी.जनबंधु अधि वर्ग २ व३ जि.प.नियंऋा | ------------ | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
१० | अल्पसंखयांक शिष्यवत्रत्ती योजना,राष्ट!ीय जिजाउफ मोपफत सायकल वाटप योजना,जवाहर नवोदय विद्यालय परिक्षा,बाल चिऋाकला स्पर्धा योजना,विभागीय परिक्षा मंडळ परिक्षेची कामे | श्री.आर.जे.गणविर शिक्षण विस्तार अधिकारी | ७ दिवस | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
११ | जिल्हा विज्ञान पर्दशन,आर्थिक दत्रष्टया दुर्बल घटक विद्यार्थ्योना सवलत योजना,सेवाअंतर्गत प्रशिक्षण,आय.सी.टी प्रशिक्षण,इन्पायर्ड अवार्ड योजना,विज्ञान मंच | श्री.एल.डी.बालवाड विज्ञान पर्यवेक्षक | ७ दिवस | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
१३ | राष्ट!ीय कत्रत योजनेतुन अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्योना मिळणारा प्रोत्साहन भत्ता,राजीव गांधी अपघात विमा योजना,आम आदमी विमा योजना तसेच मानव विकास योजना संबधी कामे. | श्री.बि.पी.मुंडे विषयतज्ञ | ७ दिवस | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
०२ | अपंग वाहन भत्ता,अपंग लाभाथर्ीेना साहीत्य वाटप करणे,कर्मचा-यांचे रोष्टर तयार करणे,व पदभरण्यास नाहरत प्रमाणपऋा देणे,वैयक्तिक मान्यता देणे. | श्री.एस.डी.चंद्रीकापुरेवरिष्ठ लिपिक | ७ दिवस | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
१२ | खाजगी माध्य शाळेतील वर्ष निहाय अनुदान निर्धारण करणे वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके मंजुर करणे,जि.प.+माध्य शाळेतील वेतन देयके मंजुर करणे,चारमाहि,आठमाहि,अकरामाहि अंदाज पऋाक तयार करणे | श्री.जे.बी.भगत वरिष्ठ लिपिक | ७ दिवस | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
१+२+३ | खाजगी शाळेतील मंडळ मान्यता,मान्यता वर्धीत,अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन,शाळा स्थलांतरण,बत्रहत आराखाड तयार करणे व पद भरण्याचे नाहरकत प्रमाणपऋा देणे,वैयक्तिक मान्यता देणे | श्री.एस.डी.चंद्रीकापुरे वरिष्ठ लिपिक | ७ दिवस | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
४ | खाजगी माध्यमिक व क.म.वि शाळेतील सेवानिवत्रत्त कर्मचा-यांचे सेवानिवत्रत्ती वेतन प्रकरण हाताळणे,सेवाखंड क्षमापित प्रस्ताव महालेखाकार व शिक्षण उपसंचालक,लोक आयुक्त व पेन्शन संबधी तक्रार हाताळणे आणि उपदानाचे देयके कोषागारात सादर करणे तसेच कार्यालयीन रोखड वहीचे कामे सांभाळणे | श्री.आर.एस.तिवारी कनिष्ठ सहारूयक | ७ दिवस | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
९ | इयत्ता १० पर्यत मुलांना मोपफत शिक्षण योजना,आदिवाशी विद्यावेतन,पि.टी.सी देयके,एस.टी.सी देयके इयत्ता १२ वी पर्यत मुलींना मोपफत शिक्षण योजना,माजी सैनिक,स्वतंऋा सग्राम सैनिक,इयत्ता ११ व १२ पर्यत १५००० पेक्षा कमी उत्पन्न असणा-या पाल्यांचा मुलांना मोपफत शिक्षण योजना | श्री.एम.डी.वाहने वरिष्ठ लिपिक | ७ दिवस | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
५ | राष्ट!ीय माध्यमिक सर्वशिक्षा अभियान अंतर्गत येणारे सर्व कामे सांभाळणे | श्री.एम.डी.वाहने वरिष्ठ लिपिक | ७ दिवस | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
८ | तालुका समादेशक यांचे आस्थापनेचे कामे सांभाळणे | श्री.बी.एन.डहाके तालुका समादेशक | ७ दिवस | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
९ | शालेय पोषण आहारचे संपुर्ण कामे | श्री.के.एस.भेलावे कनिष्ठ सहारूयक ;शि.वि.प्राथद्ध | ७ दिवस | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |
१० | आधार कार्ड संबधाने संपुर्ण कामे | श्रीमती अर्चना भिवगडे शि.वि.अ ;शि.वि.प्राथद्ध | ७ दिवस | शिक्षणाधिकारी ; माध्यमिकद्ध |